Dell Layoff
Dell Layoff Saam TV
देश विदेश

Dell Layoff : मेटा आणि ॲपलनंतर आता आणखीन एक टेक कंपनी संकटात; ६६५० व्यक्तींना गमवावी लागणार नोकरी

Ruchika Jadhav

Dell Layoff: साल २०२३ सुरू होताच जागतिक आर्थिक मंदी आल्याने अनेक मोठ्या कंपन्यांना याचा फटका बसला. यामध्ये आता Dell Technologies Inc ही कंपनी देखील आपले कर्मचारी कमी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी यूएसमध्ये असलेले ५ टक्के कर्मचारी कमी करण्याच्या तयारीत आहे. (Latest Dell Layoff News)

असे केल्यास या व्यक्तींना बेरोजगारीच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल. काही माध्यमांवर आलेल्या माहितीनुसार, Dellचे सह-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी म्हटलं आहे की, सध्या आमची कंपनी तोट्यात आहे. बाजारात असलेल्या मंदीचा परिणाम कंपनीवर होत आहे, त्यामुळे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या काळात देखील सर्व काही बंद होते. संगणक कंपन्यांवर मोठा भार पडला. एचपी या संगणक कंपनीने पर्सनल कॉम्प्युटर्सच्या विक्रीत घट झल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता Dell कंपनीची परिस्थिती पाहता पुढच्या काळात ६,६५० कर्मचारी कामावरून कमी केले जाण्याची शक्यता आहे, असं जेफ क्लार्क यांनी म्हटलं.

कंपनी काही दिवसांत ६,६५० कर्मचारी कमी करणार आहे. म्हणजे एकूण कर्मचाऱ्यांमध्ये ५ टक्के कर्मचारी कमी केले जाणार आहेत. आता पर्यंत आर्थिक मंदीमुळे ट्वीटर, मेटा, अॅपल, ॲमेझॉन,मायक्रोसॉफ्ट आणि गूगल या कंपन्यांनी देखील त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Season: उन्हाळ्यात तयार केलेले अन्न लवकर खराब होतं; तर काय करावे?

Today's Marathi News Live : म्हणून शिवसेना पक्ष कधीच राज्यात स्वबळावर सत्तेत आला नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Met Gala 2024: भारतीय सौंदर्याची चमक न्युयॉर्कपर्यंत, प्रियंकाचा लुक चर्चेत

Kokan Railway News | अवघ्या 63 सेकंदात कोकण रेल्वेची तिकीटं संपली

Shivajirao Adhalrao Patil | "कोल्हेंनी भाजपचं दार ठोठावलं होतं", काय म्हणाले आढळराव पाटील?

SCROLL FOR NEXT