Rahul Gandhi Latest Update In Marathi Saam TV
देश विदेश

Rahul Gandhi Disqualified : महिलेने चक्क ४ मजली घर केले राहुल गांधींच्या नावावर; नेमकं आहे कुठे हे घर

Congress News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

Shivani Tichkule

Rahul Gandhi News :  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते  'मेरा घर, राहुल गांधी का घर'च्या नावाने प्रचार करत आहेत. 

दरम्यान, दिल्लीतील एका महिलेने तिचे चार मजली घर राहुल गांधींच्या नावावर केले आहे. राजकुमारी गुप्ता असे या महिलेचे नाव असून त्यांनी दिल्लीतील मंगोलपुरी भागात असलेले आपले ४ मजली घर राहुल गांधी यांच्या नावावर केले आहे.

राजकुमारी गुप्ता या दिल्ली काँग्रेस (Congress) सेवादलाशी संबंधित आहेत. लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे. 27 मार्च रोजी लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने त्यांना नोटीस पाठवून 22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले होते. (Congress News)

नेमकं प्रकरण काय?

सूरतमधील एका कोर्टानं राहुल गांधींना दोषी ठरवलं. मोदी आडनावाबद्दलच्या एका टिप्पणी प्रकरणात कोर्टानं हा निकाल. राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. दुसऱ्या दिवशी २४ मार्च रोजी त्यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले. अपात्र ठरलेल्या सदस्याला त्यांचे सदस्यत्व संपुष्टात आल्यापासून एका महिन्याच्या आत अधिकृत बंगला रिकामा करावा लागतो. त्यामुळे आता राहुल गांधींना १२ तुघलक लेन येथील त्यांचा अधिकृत बंगला 22 एप्रिलपर्यंत रिकामा करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT