Delhi Protest Traffic Update News  AI image
देश विदेश

Traffic Update : दिल्लीमध्ये वाहतुकीत मोठा बदल, २२ प्रमुख मार्गांवर निर्बंध, ६ मेट्रो स्थानके बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Delhi Traffic Update News : दिल्लीमध्ये काँग्रेसच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत मोठा बदल. ६ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन

  • काँग्रेस सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढणार

  • महत्त्वाची मेट्रो स्थानके बंद

  • प्रमुख मार्गावरील वाहतूक वळवली

गेले काही दिवस दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात येत आहे. आज काँग्रेस सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. दिल्ली वाहतूक पोलिसांनी आज अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ६ वाजल्यापासून हे निर्बंध लागू करण्यात आल्याने नवी दिल्ली आणि मध्य दिल्लीतील वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच महत्त्वाची ६ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील २२ महत्त्वाचे चौक, रस्ते आणि जंक्शनवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दिल्लीतील कोणत्या रस्त्यांवर वाहतूक वळवली जाणार?

पंचकुइयां गोलचक्कर, मंडी हाऊस, पटेल चौक, रेल भवन, जनपथ परिसर, जंतरमंतर रोड, अशोक रोड, संसद मार्ग, बाराखंबा रोड आणि कनॉट प्लेस परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय मिंटो रोड, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, चेम्सफोर्ड रोड, भैरों रोड, लोधी रोड फ्लायओव्हर, नीला गुंबद गोलचक्कर, सरदार पटेल मार्ग, मोतीबाग फ्लायओव्हर आणि आरएमएल रुग्णालय परिसरातही वाहतुकीत बदल होऊ शकतात. संबंधित भागांमध्ये पोलिसांनी लावलेल्या सूचना आणि वाहतूक कर्मचाऱ्यांच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिल्ली मेट्रोच्या सहा स्थानकांवर प्रवेश बंद

रस्त्यांवरील निर्बंधांसोबतच दिल्ली मेट्रोनेही प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना दिल्याचे वृत्त आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पटेल चौक, जनपथ, राजीव चौक, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेटेरिएट आणि बाराखंबा रोड या ६ मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याची सुविधा बंद ठेवली जाणार आहे.

प्रवाशांसाठी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

रेल्वे स्थानक, आंतरराज्यीय बसस्थानक किंवा विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांनी प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा. शक्य असल्यास अनावश्यक प्रवास टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतुकीसंबंधी मदतीसाठी नागरिक १०९५ किंवा ०११-२५८४४४४४ या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. तसेच ८७५०८७१४९३ या व्हॉट्सॲप क्रमांकावरही माहिती मिळवता येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Sleeping : रात्रभर पंखा चालू ठेवून झोपताय? आजच बदला 'ही' सवय, शरीराचे होतेय गंभीर नुकसान

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा इंडिया आघाडीला भेटीस नकार, पाहा काय दिलं कारण

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री! सलमान खाननं वीकेंड का वारमध्ये दिलं सरप्राइज, सोशल मीडिया स्टार आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT