Breast Cancer : महिलांनो ब्रेस्ट दुखणं सामान्य नाही; कॅन्सरचा असू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या ६ लक्षणे?

Alisha Khedekar

ब्रेस्ट दुखणं सामान्य आहे का?

मासिक पाळी, हार्मोन्समधील बदल किंवा इतर कारणांमुळे स्तन दुखू शकतात. मात्र, सतत वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Breast cancer symptoms | Google

ब्रेस्टमध्ये गाठ जाणवणे

ब्रेस्टमध्ये किंवा काखेत नवीन गाठ जाणवणे हे महत्त्वाचे लक्षण असू शकते. प्रत्येक गाठ कॅन्सरची नसते, तरी तपासणी आवश्यक आहे.

Breast cancer symptoms | Google

ब्रेस्टच्या आकारात बदल

एका ब्रेस्टचा आकार अचानक बदलणे, सूज येणे किंवा दोन्ही ब्रेस्टमध्ये असामान्य फरक जाणवणे याकडे दुर्लक्ष करू नका.

Breast cancer symptoms | Google

त्वचेवर दिसणारे बदल

ब्रेस्टची त्वचा लाल होणे, जाड होणे किंवा संत्र्याच्या सालीसारखी दिसणे ही लक्षणे असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

Breast cancer symptoms | Google

ब्रेस्टमध्ये बदल

ब्रेस्ट आत ओढले जाणे, आकार बदलणे किंवा नवीन बदल दिसणे हे संभाव्य इशारे असू शकतात. वेळेत वैद्यकीय तपासणी करा.

Breast cancer symptoms | Google

एका ठिकाणी सतत वेदना

ब्रेस्टच्या विशिष्ट भागात सतत वेदना जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष केल्याने त्रास वाढत जाईल आणि तुम्हाला गंभीर आजाराला सामोरे जाऊ लागू शकते.

Breast cancer symptoms | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Breast cancer symptoms | Google

NEXT : हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय आहे फरक? वेळीच घ्या जाणून

Heart Attack vs Cardiac Arrest | AI Image
येथे क्लिक करा