: OPPOSITION STALLS PARLIAMENT FOR 3 DAYS OVER LATHICHARGE saam tv
देश विदेश

दिल्लीतील लाठीचार्जविरोधात विरोधक आक्रमक, संसदेत काळे कपडे घालून विरोधकांकडून निषेध

Deadlock in Parliament Deepens Over Demand for Education Minister’s Resignation: दिल्ली आंदोलनाची धग संपूर्ण देशभरात पोहोचलीये. आंदोलकांवरील लाठीचार्जविरोधात संसदेतही विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांच्या आक्रमकतेमुळे सलग 3 दिवस संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. पाहूयात यावरचा एक रिपोर्ट...

Suprim Maskar

विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर आता सरकारला संसदेत घेरलंय. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळीच याची झलक पाहायला मिळाली. लोकसभेत काँग्रेसह विरोधी पक्षांच्या खासदारांनी थेट काळे कपडे परिधान करून दिल्लीतल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर कामकाज सुरू होताच शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसनं लावून धरली. तर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात सभागृहात लोकसभा अध्यक्षांनाच खडेबोल सुनावले... संसदेच्या बाहेर बोलणारे पंतप्रधान संसदेत प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत? असा सवालही यादव यांनी केला...

तर राज्यसभेत केंद्रीयमंत्री जे पी नड्डा यांनी चर्चेची तयारी दर्शवली. मात्र धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा न करण्याची ठाम भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेंनी घेतल्यामुळे वारंवार कामकाज स्थगित करावं लागलं.

सरकार चर्चेची भाषा करतय. तर विरोधक राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे संसदेत मोठी कोंडी निर्माण झालीय. तीन दिवसांपासून सुरू असलेला हा तिढा आता सरकार नेमका कसा सोडवणार याबाबत प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे चौथ्या दिवशी तरी केंद्र सरकार यावर ठोस तोडगा काढणार की असाच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगत राहणार याकडे देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT