Shraddha Murder Case Latest Update
Shraddha Murder Case Latest Update Saam TV
देश विदेश

Shraddha Walker : श्रद्धा प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट; आफताबचं नवीन CCTV फुटेज समोर, पाहा VIDEO

साम टिव्ही ब्युरो

शिवाजी काळे, साम टीव्ही

Shraddha Murder Case Latest Update : श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येनं (Crime News) संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास वेगाने सुरू केला असून पोलिसांची दोन पथकं पाच राज्यात आरोपी आफताबविरुद्ध पुरावे शोधत आहेत. या दरम्यान, सोमवारी याप्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. यात आफताब पूनावाला हातात बॅग घेऊन जाताना दिसत आहे. (Latest Marathi News)

नव्याने समोर आलेलं हे सीसीटीव्ही फुटेज १८ ऑक्टोबरचं असल्याची माहिती आहे. सकाळी ४:३० वाजताचं हे फुटेज असल्याचं सीसीटीव्हीमधून स्पष्ट झालं आहे. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. सोयीनुसार तो ते तुकडे दिल्लीतल्या महरौली भागात फेकायचा. या सगळ्यामध्ये तिचं शीर त्याने कुठे टाकलं, याची माहिती अद्यापही पोलिसांना (Police) मिळालेली नाही.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असताना सोमवारी पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आता तपासाला अधिकच गती दिली आहे. दुसरीकडे पोलिसांच्या एका पथकाने दिल्लीतील मेहरौली जंगलातून एक कवटी आणि जबड्याचा काही भाग जप्त केला आहे.

याव्यतिरिक्त पोलिसांना जंगलात अनेक हाडे सुद्धा सापडली आहे. मात्र, पोलिसांना अद्याप श्रद्धाचे डोके आणि धड सापडलेले नाहीत. पोलीस अजूनही मेहरौलीच्या जंगलात शोधघेत आहेत. ही हाडे मानवाची आहेत की अन्य कोणाची हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ही जप्त केलेली हाडे श्रद्धा वालकरची असल्याचे निष्पन्न झाल्यास या प्रकरणाचे गूढ उकलण्यास पोलिसांना मदत मिळू शकते.

आता फॉरेन्सिक अहवालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की दक्षिण जिल्ह्य़ातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आबताब हा जंगलात शोधमोहिमेदरम्यान पोलिसांशी सामान्य पद्धतीने बोलत होता, जणू काही घडलेच नाही असे तो दाखवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या या कृत्याने स्वत: पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT