delhi farmers protest jcb poclain Saam TV
देश विदेश

Farmers Protest: केंद्रासोबतची बोलणी फिस्कटली, शेतकरी पुन्हा आक्रमक; जेसीबी-पोकलेन घेऊन आज दिल्लीकडे कूच

Shetkari Andolan News: पोलिसांनी रस्त्यावर टाकलेले खिळे, काटेरी तारांचे कुंपण, सिमेंटचे कठडे तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी जेसीबी तसेच पोकलेन मशीन आणले आहेत.

Satish Daud

Delhi Shetkari Andolan Latest News

किमान आधारभूत किंमत आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे. आमच्या मागण्या लवकर मान्य करा अन्यथा दिल्लीत येऊन चक्काजाम करू, असा इशाराच शेतकऱ्यांनी दिला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये आतापर्यंत चार बैठका झाल्या. या बैठकीत केंद्राने शेतकऱ्यांसमोर काही प्रस्ताव ठेवले. मात्र, हे प्रस्ताव अमान्य केले. सरकारसोबत आता चर्चा करण्यात काही तथ्थ नाही, असं म्हणत शेतकऱ्यांनी बुधवारपासून दिल्लीच्या दिशेने कूच करण्याची तयारी केली आहे. (Latest Marathi News)

शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. ट्रॅक्टर थांबवण्यासाठी रस्त्यावर खिळे, काटेरी तारांचे कुंपण, सिमेंटचे कठडे टाकले आहेत. मात्र, हे कठडे तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेकडो जेसीबी आणि पोकलेन मशीन तयार ठेवले आहेत.

सध्या हजारो शेतकरी हरियाणातील शंभू सीमेवर पोहचले असून पोलिसांनी टाकलेले बॅरिकेड्स तोडून मातीच्या पोत्या टाकून ट्रॅक्टर बाहेर काढण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय टिप्पर, हायड्रा आणि इतर वाहने शेतकऱ्यांनी तयार ठेवली आहेत. त्यामुळे पोलिसांसह सरकारचं टेन्शन वाढलं आहे.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणाच्या डीजीपीने पंजाबच्या डीजीपीला पत्र लिहले आहे. दिल्लीच्या दिशेने येणारे जेसीबी, पोकलेन, टिप्पर, हायड्रा आणि इतर जड दिसतील तिथे जप्त करा, असं डीजीपीने आपल्या पत्रात म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT