kalkaji temple Saam tv
देश विदेश

Shocking : मंदिरात प्रसादावरून वाद टोकाला; सेवादाराचा मारहाणीत मृत्यू

Death at kalkaji temple : कालाकाजी मंदिरात प्रसादावरून वाद टोकाला गेला. या मारहाणीत सेवादाराचा जागीच मृत्यू झाला.

Saam Tv

दिल्लीच्या कालकाजी मंदिरात प्रसादावरून वाद होऊन सेवादाराची हत्या

मृत योगेंद्र सिंह हे १५ वर्षांपासून सेवादार म्हणून करत होते काम

आरोपी अतुल पांडे याला अटक

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा

Delhi crime news : दिल्लीच्या कालकाजी मंदिर परिसरात हत्येची घटना घडली आहे. प्रसादावर झालेल्या मारहाणीत सेवादाराची मृत्यू झाला. सेवादाराच्या हत्येनंतर परिसरातील भाविकांमध्ये खळबळ उडाली.

मंदिरात मारहाणीची घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने सेवादाराला एम्स ट्रॉमा रुग्णालयात दाखल केले. मंदिरातील सेवादाराला आरोपी तरुणांनी बेदम मारहाण करत जखमी केलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात एफआयआर नोंदवून अटक केली.

तरुणांनी २९ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता सेवादाराला मारहाण केली. या हल्ल्यात मृत्यू झालेले योगेंद्र सिंह(३५) हे हरदोई येथील उत्तर प्रदेशात राहत होते. मागील १५ वर्षांपासून योगेंद्र हे सेवादार म्हणून काम करत होते. या हत्या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय अतुल पांडे यांना अटक केली आहे. पोलिसांनी अतुल पांडेला अटक करून त्याच्या इतर साथीदाऱ्यांची देखील चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१)३/(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलं की, 'आरोपी हे माताराणीच्या दर्शनासाठी कालाकाजी मंदिरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी सेवादाराकडे प्रसाद मांगितला. त्याचदरम्यान प्रसादावरून वाद वाढला. त्यानंतर हाणामारी झाली. आरोपींनी सेवादाराला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सेवादाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

मंदिरातील वादावरून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT