स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.
बॉम्ब स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात आलेल्या कार मालकाला अटक
एनआयएने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली आहे.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) ला मोठे यश मिळाले आहे. आत्मघातकी बॉम्बरसह दहशतवादी कट रचणाऱ्या व्यक्तीला एजन्सीने अटक केलीय. एनआयएनं त्याला दिल्लीत अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव आमिर रशीद अली आहे.
स्फोटात वापरलेली कार ही त्याच्याच नावावर नोंदणीकृत होती. दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास आधी दिल्ली पोलीस करत होते. त्यानंतर या स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. प्रकरण ताब्यात घेतल्यानंतर एनआयएने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली, ज्यामध्ये आमिरला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेला व्यक्ती हा जम्मू आणि काश्मीरमधील पंपोरमधील सांबुरा येथील रहिवासी आहे. आमिरने पुलवामा येथील उमर उन नबी नावाच्या व्यक्तीसोबत हल्ल्याची योजना आखली होती. आमिर दिल्लीत गाडी खरेदी करण्यासाठी आला होता. त्यानंतर ही नंतर स्फोटासाठी वापरण्यात आली, अशी माहिती तपासातून समोर आलीय. दरम्यान आमिरला ११ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते. दीर्घ चौकशीनंतर आणि त्याची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर रविवारी त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान फॉरेन्सिक तपासणीद्वारे एनआयएने स्फोटाच्या वेळी कार कोण चालवत होता, याची माहिती उघड झालीय. कारमधील ड्रायव्हरच नाव उमर उन नबी असे आहे. पुलवामा येथील रहिवासी उमर हा हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठात जनरल मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक होता. याचा अर्थ असा की दहशतवादी कटात स्वतः एक डॉक्टर सहभागी होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.