red fort attack case Saam TV
देश विदेश

Supreme Court : लाल किल्ला हल्ला प्रकरण; दहशतवादी आरिफची फाशी कायम, SC ने फेटाळली याचिका

आज सुप्रीम कोर्टाने मोहम्मद आरिफची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे.

Satish Daud

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) बॉम्बस्फोट घडविणारा लष्कर-ए-तोएबाचा दहशतदवादी मोहम्मद आरिफच्या फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कायम ठेवली आहे. आज सुप्रीम कोर्टाने मोहम्मद आरिफची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता लवकरच आरिफला फासावर लटकलं जाणार आहे.

लष्कर-ए-तोएबाचा दहशतदवादी मोहम्मद आरिफने २८ डिसेंबर २००० रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यात एका जवानासह तिघांचा मृत्यू झाला होता.

३१ ऑक्टोबर २००५ रोजी झालेल्या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने आरिफला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्याने सुप्रीम कोर्टात अपिल केले होते. सुप्रीम कोर्टाने २० एप्रिल २०११ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.

यानंतर २०१४ मध्ये सुप्रीम कोर्टानेही आरिफची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने दोषींच्या शिक्षेबाबत दाखल करण्यात आलेली पुनर्विलोकन याचिकाही फेटाळून लावली आहे. त्यामुळे लवकरच आता आरिफला फाशी दिली जाणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT