Jantar Mantar Protest: Woman Runs Away With Police Bus Keys, Viral Video saam tv
देश विदेश

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

High-Voltage Drama At Jantar Mantar: दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलनादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या बसची चावी घेऊन एक महिला पळताना दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bharat Jadhav

दिल्लीच्या जंतर-मंतरवर एक धक्कादायक प्रकार घडलाय. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अनेक अशा घटना घडल्या आहेत, ज्यामुळे वाद निर्माण झालाय. मुंबईत रिया अहिर नावाच्या एका मुलीनं पोलिसांची बस अडवली होती. त्यामुळे रिया अहिर चर्चेत आली होती. तिची अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते.

सोशल मीडियावर रियाची इतकी चर्चा झाली होती की तिला थेट बिग बॉस या कार्यक्रमात स्पर्धेक म्हणून बोलवलं होतं.आता दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एक महिला पोलिसांच्या बसची चावी घेऊन पळून जाताना दिसतेय.

आंदोलककर्त्यांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन एक महिला पळून गेल्याचा प्रकार समोर आलाय. पोलीस एक बसमध्ये आंदोलकांना दुसऱ्या ठिकाणी नेत होते, त्यावेळी एक महिला तेथे आली तिने चालकाकडून चावी हिसकावली अन् तेथून धूम ठोकली. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

या व्हिडिओमध्ये आपण पाहून शकतो की, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना बसमधून डांबून दुसऱ्या ठिकाणी नेत होते. त्यावेळी या महिलेनं बसची चावी हिसकावून घेतली आणि तेथून पळून गेली. सोशल मीडियावर त्या महिलेच्या कृतीचे काही लोक कौतुक करत आहेत. इतरांनी या घटनेच्या कायदेशीर पैलूंबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिल्लीतील जंतर-मंतरवर निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणाऱ्या एसआयआर प्रक्रियेविरोधात आंदोलन केलं जातंय. मतदार याद्यांमध्ये बदल करण्यात आल्यानं आंदोलन केलं जातंय. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. त्याच दरम्यान काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना बसमधून दिसऱ्या ठिकाणी नेत होते.

बसमधून आंदोलकांना घेऊन जात असताना एका महिलेनं चाव्या हिसकावून घेतल्या. ज्यामुळे गदारोळ झाला. त्यानंतर ती महिला गर्दीत नाहीशी झाली, तर काही लोकांनी त्या चाव्या परत मिळवण्यासाठी तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात बसची चावी घेऊन पळून गेलेल्या महिलेबद्दल बसचालक बोलताना दिसतोय. चावीशिवाय बस चालवणे शक्य नसल्याने, पोलीस कर्मचारी बस पुढे ढकलतानाही दिसत आहेत.

सोशल मीडियावर सुरू शाब्दिक युद्ध

याचदरम्यान सोशल मीडियावर याप्रकारावरून नेटकऱ्यांमध्ये वाद सुरू झालाय. महिलेच्या व्हिडिओवर नेटकरी आप-आपली प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी महिल्याच्या कृत्याचं कौतुक केलंय. तर काहींना त्या महिलेवर टीका केलीय. अशा प्रकारे बस थांबवणं हे चुकीचं असून तिच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नेटकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

Maharashtra News Live Update: सांगलीत अभियांत्रिकी विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; गुंगीचे औषध देऊन लॉजमध्ये नेल्याचा आरोप

Alcohol Side Effects: दारू प्यायल्यानंतर व्यक्तीचं नियंत्रण का सुटतं?

घरी बोलवायचा, अश्लील भाषेत बोलायचा, स्टेशन मास्तरचा संतापजनक प्रकार; महिलेची मनसेकडे तक्रार अन् पुढे काय घडलं?

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

SCROLL FOR NEXT