Brij Bhushan Sharan Singh News: कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या महिला पहिलवानांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी पोलिसांनी आज ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती न्यायालयाला दिली. (Latest Marathi News)
पहिलवानांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. महिला पहिलवानांना सुरक्षा देण्यात यावी तसंच खेळाडूंनी केलेल्या आरोपावर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी, अशी मागणी सिब्बल यांनी न्यायालयात केली.
महिला पहिलवानांना सुरक्षा देण्यात यावी तसंच खेळाडूंनी केलेल्या आरोपावर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी अशी मागणी सिब्बल यांनी न्यायालयात केली. यावर न्यायालयाने खेळाडूंना सुरक्षा देण्याचे आदेश दिले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कुस्तीपटूंचे सध्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिला कुस्तीपटूंनी केली होती.
विनेश फोगाटसह 7 महिला पहलवानांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २१ एप्रिलला दिल्लीच्या कॅनोट प्लेस इथं गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही गुन्हा दाखल केला नाही,असं याचिकेत म्हटलं आहे.
गेल्या सुनावणी दरम्यान मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणात झापले होते. तक्रार दाखल होऊनही तपास पुढे का नाही ? अशी विचारणा न्यायालयाने पोलिसांना केली होती. त्यावर पोलिसांनी आपलं म्हणणं सर्वोच्च न्यायालयात आज मांडलं त्यानुसार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.