Delhi Police STF Nabs Wanted Gangster Maya Saam Tv
देश विदेश

शूटआउट ॲट लोखंडवाला! पोलसांनी सिनेस्टाईल कुख्यात गुंडांच्या आवळल्या मुसक्या, एन्काउंटरमध्ये गँगस्टर माया जखमी

Shootout in Sarita Vihar: सरिता विहारमध्ये एसटीएफ अन् माया यांच्यात चकमक. पोलिसांकडून गुंडावर गोळीबार. माया जखमी. आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

Bhagyashree Kamble

  • STF अन् माया यांच्यात चकमक.

  • गोळीबारानंतर माया जखमी.

  • मायावर ८ गंभीर गुन्हे दाखल.

दक्षिण पूर्व दिल्लीतील सरिता परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स आणि कुख्यात गुंड सागर उर्फ माया यांच्यात रविवारी मध्यरात्री चकमक झाली. या चकमकीत गुन्हेगार माया जखमी झाला. पोलिसांनी तातडीनं त्याला ताब्यात घेतलंय.

कुख्यात गुंड मायावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरोडा, चोरी असे एकूण आठ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. फक्त २३ वर्षांचा माया कमी वयात कुख्यात गुंड बनला. अमर कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दरोड्याप्रकरणी तो वॉन्टेड होता. पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

शूटआउट अॅट लोखंडवाला चित्रपटातील मुख्य पात्र माया डोलासपासून प्रेरित होऊन त्यानं माया भाई बनण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानं गँगचा लोगोही तयार केला होता. 'मौत का दुसरा नाम माया', असं त्यानं गँगच्या लोगोचं नाव ठेवलं होतं. गँगमधील प्रत्येक सदस्यानं हातावर 'मौत' नावाचं टॅटू गोंदवून घेतलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माया सरिता विहार परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, एसटीएफच्या पथकानं धाड टाकली. मायानं पोलिसांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. यात कुख्यात गुंड माया जखमी झाला. पोलिसांनी तातडीनं मायाला ताब्यात घेतलं. त्याच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

माया आणि त्याची टोळी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय होती. स्थानिकांकडून गुंड खंडणीही उकळत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीत ही टोळी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होती. मात्र, पोलिसांनी वेळेवर कारवाई करून कुख्यात गुंड माया अन् त्याच्या टोळीचा कट उधळून लावलाय. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांनी अडून धरला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा

Devendra Fadnavis : पोस्टमार्टम शिवाय जनावरांची नुकसान भरपाई मिळणार, देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांना दिलासा

'या' देशात घेऊ शकता कमी खर्चात शिक्षण; परदेशात शिकण्याचं स्वप्न करा पूर्ण

Navratri 2025 : गरबा खेळताना थकवा येणार नाही; फक्त 'या' ५ गोष्टी करा, एकदम फ्रेश वाटेल

पंतप्रधान मोदींचा 'तो' फोटो व्हायरल, काँग्रेस नेत्याला साडी नेसवली, डोंबिवलीत भाजप आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT