Swati Maliwal Latest News Saam TV
देश विदेश

Delhi News: आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल गोत्यात येणार? दिल्ली पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Swati Maliwal Latest News : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Satish Daud

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानात जबरदस्तीने प्रवेश करून गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी पोलिसांत दाखल केली होती.

विभव कुमार यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, स्वाती मालीवाल यांनी १३ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जबरदस्तीने प्रवेश केला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं तेव्हा त्यांनी आपण राज्यसभा खासदार असल्याचं सांगितलं.

मी मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट घेतली असं त्यांनी सांगितलं. वाट पाहायला सांगितल्यावर त्या आरडाओरडा करू लागल्या. सुरक्षा अधिकाऱ्यांनी मालीवाल यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी गोंधळ घातला. तसेच शिवीगाळ देखील केली, मालीवाल यांनी केलेले आरोप खोटे आहेत, असं तक्रारीत म्हटलं आहे.

"स्वाती मालिवाल भाजपच्या षडयंत्राचा भाग"

स्वाती मालिवाल भाजपच्या षडयंत्राचा भाग असल्याचं म्हणत आपच्या प्रवक्त्या आतिषी यांनी गंभीर आरोप केले आहेत. जेव्हापासून अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. तेव्हापासून भाजपचा तिळपापड झाला आहे. भाजपनं एक षडयंत्र रचलं, त्या षडयंत्राचा एक भाग म्हणून स्वाती मालिवाल यांना केजरीवाल यांच्या घरी पाठवण्यात आलं होतं, असं आतिषी यांनी म्हटलंय.

"मुख्यमंत्री त्यावेळी निवास्थानी नव्हते, त्यामुळे ते वाचले. मग स्वाती मालीवाल यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्यावर आरोप केले. आपल्याला बेदम मारहाण झाल्याचे त्या सांगत आहेत. पण आजच्या व्हिडिओने सत्य समोर आले", असे गंभीर आरोप आतिशी यांनी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितृपक्षात आवर्जून बनवा भोपळ्याची भाजी, कांदा-लसूणशिवायही लागेल एकदम चविष्ट

Bribe Case : पोलीस अधिकाऱ्याने ₹१३०००० घेतले, पण अचानक ACB चं पथक धडकले, लाचखोर PSI कसा अडकला जाळ्यात

Car Engine Oil: किती किलोमीटर्सनंतर कारचं इंजिन ऑईल बदललं पाहिजे?

Maharashtra News Live Update: पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती मंदिरात चोरट्यांचा डल्ला

Hingoli Fire : अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग; ३ जणांचा मृत्यू, दुचाकी चालकाचा कोळसा, ११ जखमी

SCROLL FOR NEXT