lok sabha security breach Update in Marathi  Twitter
देश विदेश

Parliament Attack: संसदेची सुरक्षा भेदणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल; आरोपींनी प्लान कसा रचला? चौकशीत धक्कादायक माहिती

Parliament Security Breach: संसदेची सुरक्षा भेदून सभागृहात गोंधळ घालणाऱ्या ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने UAPA कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.

Satish Daud

Parliament Security Breach

संसदेची सुरक्षा भेदून सभागृहात गोंधळ घालणाऱ्या ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने UAPA कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. आज सर्व आरोपींनी कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, आरोपींनी संसदेत घुसण्याचा प्लान कसा रचला? याबाबतची माहिती समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संसदेत घुसण्याचा प्लॅन जवळपास दीड वर्ष आधीच तयार करण्यात आला होता. संशयित आरोपीपैकी ४ आरोपी वर्षभरापूर्वी फेसबुकवर एकमेकांना भेटले. त्यांनी भगतसिंग नावाचा ग्रुप देखील तयार केला.

या ग्रुपच्या माध्यमातून ते एकामेकांच्या संपर्कात राहत होते. त्यांचे विचार एकमेकांशी जुळले होते. या प्रकरणात पाचवा आणि सहावा आरोपी देखील त्यांच्या प्लानमध्ये सहभागी झाला. तीन दिवसांपूर्वी आरोपी दिल्लीत दाखल झाले होते.

आरोपी मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल वेगवेगळ्या वेळेत दिल्लीत आले होते. त्यानंतर आरोपी विकी शर्मा आणि ललित झा देखील दिल्लीत आले. पाचही तरुण मंगळवारी रात्री गुरुग्राममध्ये एकाच ठिकाणी थांबले होते. दरम्यान, बुधवारी आरोपींनी संसदेची सुरक्षा भेदून सभागृहात प्रवेश केला.

सागर शर्मा आणि कर्नाटकच्या मनोरंजन याने सभागृहात उड्या मारल्या. याचबरोबर स्मोक कॅण्डल देखील जाळले. त्यामुळे सभागृहात धुराचे लोट पसरले. हे सगळं घडत असताना संसदेबाहेर, नीलम सिंग आणि अमोल शिंदे निदर्शन करत होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून एकजण फरार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT