Delhi Police Row: Allegations Over Treatment Of Women Protesters 
देश विदेश

दिल्लीत रक्षकांकडूनच 'दुर्गे'चा छळ; महिला आंदोलकांसोबत पोलिसांची गुंडगिरी

Delhi Protest Row: नवरात्रीदरम्यान दिल्लीतील महिला आंदोलकांसोबत झालेल्या कथित गैरवर्तनावरून वाद निर्माण झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होतोय.

Snehil Shivaji

  • दिल्लीतील महिला आंदोलकांसोबत पोलिसांनी कथित गैरवर्तन

  • या प्रकरणामुळे दिल्ली पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होतोय.

  • नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचा उल्लेख

आता बातमी ऐन नवरात्रीत सुरू असलेल्या दुर्गेच्या छळाची. दिल्ली पोलीस की गुंड? असा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या दिल्लीतल्या आंदोलनात आहे. दिल्ली पोलिसांनी महिला आंदोलकांसोबत नेमकं काय केलं? काय सर्वत्र दिल्ली पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला जातोय? पाहूयात या रिपोर्टमधून.

देशभरात नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या पूजनाला सुरुवात झालीये. मात्र दुसरीकडे, देशाच्या राजधानी दिल्लीत मात्र ज्या खाकी वर्दीवर महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आहे, त्याच पोलिसांनी महिलांच्या अब्रूचे कसे धिंडवडे उडवलेत, त्याचे हे संतापजनक व्हिडीओ लाज आणणारे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी नं पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणींना ताब्यात घेताना जे घडलं, ते लाजवणारं आहे.

आंदोलक महिलांना हुसकावून लावताना पुरुष पोलिसांकडून झालेले चुकीचे स्पर्श आणि ताब्यात घेण्याची पद्धत संताप आणणारीये. या घटनांचे दृष्य डोळे उघडून नीट निरखून पाहा, देशाच्या लेकींना जनावरांसारखी फरफटत नेण्याची ही कसली मग्रुरी? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल.

AISA ची अध्यक्षा नेहा बोरा पोलिसांना चकवा देऊन पुढे जात असतांना समोरुन आलेल्या एका पोलिसांने थेट नेहा बोराला पकडण्यासाठी उडी मारली आणि याच वेळी या पोलिसांचा हात नेहा बोराच्या छातीवर धडकला. संतापून तीनं त्या पोलिसाकडे पाहिल्यानंतर मग या पोलिसाने हात जोडले पण तोपर्यंत आंदोलकांना ताब्यात घेण्याची ही पद्धत कॅमेऱ्यात कैद झाली.

आंदोलक मुलीला कशा पद्धतीनं ताब्यात घेतायत ते पाहा. ही दृष्य अंगावर काटा आणणारीयेत. जीन्स आणि क्रॉप टॉप घालून आंदोलन करणाऱ्या या मुलीच्या डोक्यावर तिरंगा होता. तो पायदळी तुडवण्यात आला. त्या मुलीला उचलून घेऊन जाण्यासाठी 5-5 पोलिस तिला कसे फरफटत होते पाहा.

आंदोलनात सहभागी झालेल्या मुलींना कशा पद्धतीनं जखमा झाल्या ते पाहण्यासाठी या मुलीचा हा व्हिडीओ बघा. हातापायावर जखमा झाल्या ते त्यामुलीनं व्हीडीओ रेकॉर्डिग करुन जगाला दाखवलं. त्यामुळे या मुलींना ताब्यात घेतांना त्यांच्यावर अमानवीय अत्याचार केल्याचा आरोप सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी केलाय.

आता सांगा, ही दृष्य पाहून तुम्ही नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी या देवी सर्वभूतेषु.. मातृरूपेण संस्थिताचा मंत्र पठण कसा कराल? ज्यांच्या खांद्यावर सुरक्षेची ढाल आहे, तेच रक्षक जर भक्षकासारखे महिलांच्या अब्रूवर आणि सन्मानावर घाला घालायला लागले, तर मग लेकींनी न्याय मागण्यासाठी जायचं कुणाकडे? देशात यापूर्वी शेकडो आंदोलनं झाली, राजकीय संघर्ष झाले, पण अशा पद्धतीनं लेकींच्या अब्रूशी खेळणाऱ्या कारवाया कधीच झालेल्या नाहीत. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांच्या या निंदनीय आणि मस्तवालपणाचा सर्वत्र निषेध होतोये. खाकीच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्या दिल्ली पोलिसांना एकवेळ सरकार माफ करेल पण आदिशक्ती या नरकासूरांना माफ करणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP आंदोलन करणार की थांबवणार, कोर्टाच्या बंधनानंतर दीपके काय करणार?

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT