Illegal Café-Bar Running Without License Exposed in Delhi Saam
देश विदेश

पोलिसांचा बारवर छापा; महिला अन् पुरूष सोफ्यावर बसून करत होते भयंकर कृत्य, २५ जण ताब्यात

Illegal Café-Bar Running Without License Exposed in Delhi: दिल्ली पोलिसांनी समयपूर बादली येथील एका बेकायदेशीर बार कम क्लबवर मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेतलं.

Bhagyashree Kamble

दिल्ली पोलिसांनी समयपूर बादली परिसरात एका बेकायदेशीर बार कम क्लबवर धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी ऑपरेटर, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण २५ जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समयपूर मुख्य चौकातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून कारवाई केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

डीसीपी हरेश्वर स्वामी म्हणाले की, 'जेव्हा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांना अनेक लोक संशयास्पद पद्धतीने इमारतीत प्रवेश करताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्या लोकांचा पाठलाग केला. तेथे 'थ्री बॉक्सेस कॅफे' नावाचे कॅफे सुरू असल्याचं दिसलं. निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ तिथे गाणी वाजवून तरूणांचा धिंगाणा सुरू होता'.

पोलिसांना काही जण हुक्का ओढत असल्याचं आढळले. तर, वेटर त्यांना दारू देत होते. पोलिसांनी बारमध्ये प्रवेश करत, बारच्या संबंधित कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. परंतु, त्याच्याकडे बार किंवा हुक्का बार चालवण्याचा परवाना नव्हता. त्यानंतर पोलिसांनी बारवर धाड टाकली. धाडीत पोलिसांना काही संशयास्पद वस्तू सापडले.

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून एकूण २५ जणांना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. सध्या पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी फरार आरोपी भरत भगतला अटक

Shubman Gill: शहरात दूषित पाणी! शुभमन गिलने हॉटेलच्या रूममध्ये लावला ३ लाखांचा वॉटर प्युरिफायर

Raj K Purohit Death : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन

Republic Day 26 : 'उरी' ते 'राझी'; प्रजासत्ताक दिनाला लहान मुलांना आवर्जून दाखवा 'हे' देशभक्तीपर चित्रपट

8th Pay Commission: लेव्हल १ ते १८; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

SCROLL FOR NEXT