Delhi police officers attacked with chilli powder in Mukundpur Saam TV
देश विदेश

पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, लाठ्या-काठ्या अन् विटांनी बेदम मारलं, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

Delhi Police latest news : दिल्लीतील मुकुंदपूरच्या जनता विहार परिसरात वाहन जप्त केल्याच्या रागातून पोलिसांवर हिंसक हल्ला करण्यात आला. आरोपींनी पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लाठ्या-काठ्या आणि विटांनी मारहाण केली.

Namdeo Kumbhar

Delhi police officers attacked with chilli powder in Mukundpur : राजधानी दिल्लीतील मुकुंदपूर परिसरात गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर हिंसक जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेकिंगदरम्यान एका वाहनावर कारवाई करून ते जप्त केल्याचा राग मनात धरून, वाहनाच्या मालकासह त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला चढवला.

हल्लेखोरांनी आधी पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्यानंतर लाठ्या-काठ्या तसेच विटांनी पोलिसांना बेदम मारहाण केली. या हिंसक घटनेत तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर कुख्यात गुन्हेगार असलेला मुख्य आरोपी सुनील ऊर्फ पंकज आणि त्याचे इतर साथीदार फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

दिल्लीतील भालसा डेअरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता विहार, मुकुंदपूर येथे पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला झाला . या घटनेत तीन अधिकारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले, तर मुख्य आरोपी आणि इतर फरार झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हेड कॉन्स्टेबल दिनेश आणि हेड कॉन्स्टेबल राजेश जनता विहारमध्ये गस्त घालत होते. तपासादरम्यान, त्यांना एक मोटारसायकल आढळली, जिची वैध कागदपत्रे नव्हती. नियमांनुसार, दिल्ली पोलीस कायद्याच्या कलम ६६ अन्वये ती मोटारसायकल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.

पोलिसांवर काठ्यांनी हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन पोलीस ड्युटीवर आले होते. त्यावेळी बाईकचा मालक आणि त्याचे काही कुटुंबीय तिथे आले. पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत आरोपींनी पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्यांच्यावर विटा आणि लाठ्या काठ्यांनी हल्ला केला.

हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले

मदतीसाठी आलेले हेड कॉन्स्टेबल टिनू यांच्यावरही हल्ला झाला. तिन्ही पोलीस जखमी झाले, तर दिनेशच्या डोक्याला दुखापत झाली. या प्रकरणात एफआयआर क्रमांक ५३७/२६ दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. मुख्य आरोपी, सुनील उर्फ ​​पंकज, हा याच परिसरातील रहिवासी असून त्याच्यावर एनडीपीएस कायद्याशी संबंधित दोन आणि इतर गंभीर गुन्ह्यांसह एकूण पाच गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Protest : मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडे अर्ज; परवानगी मिळणार का?

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! डायरेक्ट ₹५१००० वाढणार पगार, निवृत्ती वेतनधारकांचीही होणार चांदी

Maharashtra News Live Update: अमरावतीत एकाच कुटुंबातील सख्ख्या चिमुकल्या बहिण भावाला सर्पदंश

Nath Design: सणासुदीला मराठमोळ्या लूकसाठी 'या' ७ नथ नक्की ट्राय करा; नऊवारी, साडी आणि ड्रेसवर दिसाल सुंदर

राज्य महिला आयोगावर डॅशिंग अधिकाऱ्याची नियुक्ती; 3 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT