Delhi Crime Saam Tv
देश विदेश

१०० तरुणींना जाळ्यात ओढले; 12 वी पास तरूण स्वतःच असा अडकला

Delhi Crime : आपण व्हीआयपी असल्याचं सांगत एका 12 वी पास तरुणाने तब्बल 100 तरुणींना फसवल्याची माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : लग्न जुळवण्यासाठी अलीकडील काळात मॅट्रिमोनिअल साईट्सचा वापर वाढला आहे. मात्र याच साईट्सवरून तरुणींशी संपर्क साधून आर्थिक फसवणुकीसह त्यांचे शारीरिक शोषणही केले जात आहे. असाच एक धक्कादायक प्रकार दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) उघडकीस आणला आहे. आपण व्हीआयपी (VIP) असल्याचं सांगत एका 12 वी पास तरुणाने तब्बल 100 तरुणींना फसवल्याची माहिती समोर आली आहे. एका डॉक्टर महिलेच्या (Doctor Women) तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी या भामट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Latest Marathi Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान खान (वय 32) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा स्टेशन रोड, फरिस्ता कॉम्प्लेक्स, तकियामपारा, ओडिशा येथील रहिवासी आहे. आपण व्हीआयपी असल्याचं सांगत फरहान याने उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, दिल्ली, पंजाब, मुंबई, ओडिशा, कर्नाटक अशा अनेक राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील तरुणींची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. आरोपी फरहान खानला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून बीएमडब्ल्यू कार, अनेक एटीएम कार्ड आणि वेगवेगळे सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील राहणाऱ्या एका महिला आरोपीविरुद्ध दक्षिण दिल्ली सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. एम्समध्ये काम करणाऱ्या महिला डॉक्टरने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, आरोपीसोबत तिची भेट एका मॅट्रिमोनिअल साईटवरून झाली होती. त्यावेळी आरोपी फरहान याने स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगत महिलेला महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. आरोपी महिलेला भेटायला बीएमडब्ल्यू कारने येत असल्याने महिलेलाही त्यावर विश्वास बसला. आपण व्हीआयपी असल्याचं सांगत त्याने व्यवसायाच्या नावाखाली त्याने डॉक्टर महिलेकडून तब्बल 15 लाख रुपये उकळले. मात्र जेव्हा या महिलेला त्याचे कारनामे कळाले तेव्हा तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपी फरहान हा दिखावा करण्यासाठी प्लेन, ट्रेन आणि लक्झरीने प्रवास करायचा आणि व्हिडिओ कॉलद्वारे मुलींना आपण व्हीआयपी असल्याचं भासवत असायचा इतकंच नाही तर आपण उच्चशिक्षित असून इंजिनिअरिंग आणि एमबीए केलेलं आहे असंही तो सांगायचा आरोपीने मॅरेज पोर्टलवर आपले वार्षिक उत्पन्न 30-40 लाख रुपये जाहीर केले होते. आरोपीने त्याच्या आलिशान जीवनशैलीने प्रभावित झालेल्या मुलींना पैशाचे आमिष दाखवले. आपल्या आई वडिलांचे अपघातात निधन झाले असल्याचं सांगत तो तरुणींची सहानुभूती सुद्धा मिळवायचा.

दरम्यान, डॉक्टर महिलेला जेव्हा आरोपी फरहान याचे कारनामे कळाले, तेव्हा तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याची चौकशी केली असता. त्याने लग्नाचे अमिष दाखवून 100 तरुणींची फसवणूक केल्याचं उघडं झालं आहे. मुळात फरहान हा ओडिशा येथील रहिवासी आहे. त्याचे फक्त 12वी पर्यंत शिक्षण झाले असून 2015 मध्ये लग्नही झाले. इतकंच नाही तर त्याला 3 वर्षाची मुलगी सुद्धा आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT