NEET protest outside Parliament latest news Saam
देश विदेश

दिल्लीत आंदोलन भडकले! लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर, अनेक विद्यार्थी बेशुद्ध; संसदेच्या दारात पोलिसांचा बळाचा वापर

NEET protest outside Parliament latest news : संसदेकडे निघालेल्या CJP आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी अश्रुधुराचा वापर, वॉटर कॅनन आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली. परिस्थिती तणावपूर्ण बनली असून आंदोलन सुरू आहे.

Namdeo Kumbhar

NEET परीक्षा घोटाळा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचा (CJP) मोर्चा थेट संसदेच्या दारापर्यंत जाऊन पोहोचला. जंतर-मंतरवरून निघालेल्या विद्यार्थ्यांच्या या प्रचंड जमावाला पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला आहे.

पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. त्यामुळे संसदेच्या बाहेर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संसदेबाहेरील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात आहे, अश्रुधुरांचा वापर केला पण विद्यार्थी एक इंचही मागे हटायला तयार नाहीत. शिक्षणमंत्र्यांनी राजीनमा द्यावा, ही मागणी जोर धरल्याची दिसत आहे.

जंतर-मंतरवरून संसदेकडे निघालेल्या या भव्य मोर्चावर पोलिसांनी भीषण लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या कडक कारवाईत आणि वाढत्या डिहायड्रेशनमुळे अनेक आंदोलक विद्यार्थी जागीच बेशुद्ध पडले. त्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या आंदोलनाला विरोधकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. आम आदमी पक्षाचे बडे नेते मनीष सिसोदिया, अतिशी आणि काँग्रेसचे कपिल सिब्बल हे स्वतः रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांना पाठिंबा देत होते, मात्र पोलिसांनी त्यांनाही पुढे जाण्यापासून रोखले. दुसरीकडे, सत्ताधारी खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया देत, "संसदेत गोंधळ घालून प्रश्न सुटणार नाहीत, शांततेत चर्चा झाली पाहिजे," असे वक्तव्य केले आहे.

कमांडो आणि वॉटर कॅनन तैनात

संसदेवर काढण्यात आलेला हा मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाकडून आधीच मोठी तयारी करण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी वॉटर कॅनन आणि बंदूकधारी कमांडो तैनात केले. सरकार चर्चेचा मार्ग टाळून आंदोलकांना बळाचा वापर करून पांगवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी केला.

धर्मेंद्र प्रधानांना घरी पाठवा, विद्यार्थ्यांचा एल्गार

पोलिसांनी लाठ्या-काठ्यांचा वापर केला आणि अश्रूधूर सोडला, तरीही आंदोलक आणि विद्यार्थी इंचभरही मागे हटायला तयार नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊन घरी जावे, अशा जोरदार घोषणांनी संसदेचा परिसर दुमदुमून गेला आहे. गेली दोन महिने नीट घोटाळ्यावरून देशभरात असंतोष पसरला असताना सरकार कोणताही प्रतिसाद देत नाही, त्यामुळे देशभरातली तरुणाई दिल्लीत रस्त्यावर उतरली आहे.

संसदेच्या आत शांतता, बाहेर विद्यार्थ्यांचा आक्रोश

एककीकडे संसदेच्या आत अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत होते, तर दुसरीकडे संसदेच्या अवघ्या काही अंतरावर तरुणांवर लाठ्या चालवल्या जात होत्या. गेल्या २२-२३ दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत हे विद्यार्थी शांततेत लढा देत होते, परंतु सरकारने चर्चेचा मार्ग टाळल्यामुळे आज हा असंतोष रस्त्यावर फुटल्याची जोरदार टीका करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Email Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 'ही' सेवा 31 डिसेंबरपर्यंत फ्री, आताच करून घ्या नाहीतर...

Manoj Jarange : उपोषणाचा तिसरा दिवस अन् अचानक वाढली शुगर! जरांगे पाटलांचा सरकारवर मोठा आरोप; काय म्हणाले डॉक्टर?

Maharashtra News Live Update: पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Bollywood Actor : चालणं-बोलणंही झालेलं कठीण; ब्रेन स्ट्रोकनंतर बॉलिवूड अभिनेत्याचं बदललं संपूर्ण आयुष्य, रोज घ्यावी लागतात ८ औषधे

Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यानंतर शरीरात होतात 5 जबरदस्त बदल जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT