Home Ministry Fire Saamtv
देश विदेश

Home Ministry Fire: मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्रालयात भीषण आग; कॉम्प्युटर, कागदपत्रे जळून खाक

Home Ministry Fire: दिल्लीमधील केंद्रीय सचिवालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृह मंत्रालयाच्या (MHA) कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी (16 एप्रिल) सकाळी आग लागली.

Gangappa Pujari

दिल्ली|ता. १६ एप्रिल २०२४

दिल्लीमधील केंद्रीय सचिवालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृह मंत्रालयाच्या (MHA) कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी (16 एप्रिल) सकाळी आग लागली. त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली असून अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

दिल्लीत कडाक्याच्या उन्हामुळे आगीच्या घटनाही समोर येत आहेत. अशातच केंद्रीय सचिवालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृह मंत्रालयाच्या (MHA) कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी (16 एप्रिल) सकाळी आग लागली. त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि सकाळी ९.३५ पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. हिंदी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गृह मंत्रालयाच्या कार्यालयातील आयसी विभागात दुसऱ्या मजल्यावर सकाळी 9.20 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी 9.35 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली.

दरम्यान, ही आग एसीच्या युनिटमधून लागल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत एसी, झेरॉक्स मशिन, काही संगणक आणि काही कागदपत्रांसह पंखेही आगीने जळून खाक झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ज्या कार्यालयात ही आग लागली ते आयकर विभागाचे कार्यालय असल्याचे सांगण्यात आले. आग लागली तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह इमारतीत उपस्थित नव्हते, परंतु अनेक वरिष्ठ अधिकारी तेथे उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT