अजय देवगणच्या 'दृष्यम' चित्रपटाच्या कथानकापेक्षा भयंकर हत्याकांड वास्तवात दिल्लीत घडलं आहे. प्रेयसीवर वाईट नजर ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची क्लार्कने हत्या केली. हत्येनंतर मृतदेह सरकारी निवासस्थानासमोरील अंगणातच पुरला. त्यावर फरशी बसवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. आरके पुरम परिसरात ही घटना घडली. (Latest Marathi News)
हे भयंकर हत्याकांड घटनेच्या पाच दिवसांनंतर उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने चौकशीत दिलेल्या माहितीनंतर पोलीसही हादरून गेले.
आरोपी अनीसने पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिली. वरिष्ठ अधिकारी असलेल्या महेशकुमारची त्याच्या प्रेयसीवर वाईट नजर होती. याशिवाय महेशकुमारला अनीसचे ९ लाख रुपये द्यायचे होते. या दोन्ही गोष्टींवरून अनीसचा त्याच्यावर प्रचंड राग होता. याच रागातून त्याने महेशला संपवण्याचा कट आखला.
'दृष्यम'सारखा प्लान
'दृष्यम' सिनेमातील कथानकाप्रमाणं अनीसनं महेशच्या हत्येचा कट रचला होता. ऑफिसमधून सुट्टी घेऊन तो २८ ऑगस्टला लाजपत मार्केटमध्ये गेला. तिथून त्यानं ६ फुटांची बॅग आणि फावडा खरेदी केला. त्याच दिवशी दुपारी साधारण १२ वाजता महेश त्याच्या घरी पोहोचला. तिथंच घात झाला.
अनीसने महेशच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार केला. त्यात जखमी झालेल्या महेशचा मृत्यू झाला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून घटनेनंतर आरोपीने सोनीपतमधील आपलं घर गाठलं.
मृतदेह अंगणात पुरला
घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ ऑगस्टला अनीस परत आला. सरकारी निवासस्थानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत खड्डा खोदला. त्या खड्ड्यात मृतदेह पुरला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्यावर त्याने फरशी बसवली.
महेश बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या भावाने आरके पुरम पोलीस ठाण्यात केली होती. आपला सहकारी अनीसला भेटण्यासाठी जात असल्याचे त्याने पत्नीला सांगितले होते. त्यानंतर महेशबद्दल मी आणि वहिनीने अनीसला विचारणाही केली होती. पण आमच्या भेटीनंतर महेश निघून गेल्याचे अनीसने सांगितल्याचे तक्रारीत नमूद केलं होतं.
पोलिसांनी महेशचा शोध घेतला. या घटनेच्या पाच दिवसांनी अखेर घटनेचा छडा लागला. या घटनेचा वेगवेगळ्या दिशेने तपास केला. महेशचा शोध घेत असतानाच त्याचा मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.