Arvind Kejriwal  Yandex
देश विदेश

Arvind Kejriwal : माझी चिंता करू नका, लवकरच...; अरविंद केजरीवालांनी तुरुंगातून कोणता मेसेज दिला?

Delhi Liquor Scam: नुकताच सुनीता केजरीवाल आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर आतिशी यांनी माध्यामांशी संवाद साधत केजरीवाल नेमकं काय म्हणाले हे सांगितले.

Priya More

दिल्ली दारू घोटाळ्याशी (Delhi Liquor Scam) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना एक महत्वाचा मेसेज दिला आहे. 'माझी चिंता करू नका, मी लवकरच बाहेर येईन.', असे अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी सांगितले आहे. नुकताच सुनीता केजरीवाल आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर आतिशी यांनी माध्यामांशी संवाद साधत केजरीवाल नेमकं काय म्हणाले हे सांगितले.

आतिशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मी मुख्यमंत्री अरविंद यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारले. त्यांनी सांगितले की, तुम्ही लोकांनी माझी काळजी करू नका, फक्त दिल्लीच्या जनतेची काळजी करा आणि त्यांची काळजी घ्या. त्यांनी मला दिल्लीतील जनतेला दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधांची सद्यस्थिती विचारली आणि उन्हाळ्यात कोणालाही पाण्याची कमतरता भासू नये असे निर्देश दिले. यासोबतच त्यांनी दिल्लीतील माता-भगिनींना सांगितले आहे की, ते लवकरच तुरुंगातून बाहेर येतील आणि त्यांना एक हजार रुपये मानधन देईन.'

आतिशी यांनी पुढे सांगितले की, 'मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मला विचारले की मुलांना पुस्तकं वेळेवर पोहोचतात का? मुलांना अभ्यासात काही अडचण येत आहे का? दवाखाने आणि रुग्णालयातील समस्या सुटल्या की नाही? दिल्लीतील लोकांना औषधे मिळत आहेत की नाही? केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याची समस्या भेडसावणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. तसंच, लवकरच तुरुंगातून बाहेर येईल असं सांगत त्यांनी दिल्लीतील महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या मानधनाची योजना आखत असून लवकरच त्यांना एक हजार रुपये दिले जातील असे सांगितले.

आम आदमी पार्टीने यापूर्वी दावा केला होता की, सुनीता केजरीवाल यांना त्यांचे पती अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी तिहार तुरुंगात जाण्याची परवानगी नव्हती. त्याबाबत आम आदमी पक्षाने नाराजी व्यक्त केली होती. मात्रे, नंतर आपने सुनीता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांना भेटण्याची परवानगी मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सुनीता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात भेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरी ईडीची धाड; १२ ठिकाणी छापेमारी

ऑफिसमध्ये घुसला अन् अंदाधुंद गोळीबार, स्वत:वरही झाडल्या गोळ्या, ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: रेव्ह पार्टीचा खरा सूत्रधार कोण? ठाकरेंनी अग्रलेखात थेट 'या' भाजप नेत्याचं नाव घेतलं

Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर ओसरणार! | VIDEO

Versova-Madh Bridge: २२ किमीचं अंतर फक्त ५ मिनिटात, वर्सोवा-मढदरम्यान तयार होणार केबल ब्रिज

SCROLL FOR NEXT