PTI
देश विदेश

Swati Maliwal Assault Case: मालीवाल प्रकरणाने भारताची प्रतिमा मलीन: LG विनय कुमार सक्सेना

Swati Maliwal Assault Case: आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत घडलेल्या घटनेवरून राजकारण सुरू आहे. दरम्यान, दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी या घटनेवर प्रथमच प्रतिक्रिया दिलीय. मालीवाल यांच्यावरील कथित हल्ल्याबद्दल नायब राज्यपालांनी शोक व्यक्त केलाय.

Bharat Jadhav

नवी दिल्ली : दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी स्वाती मालीवाल प्रकरणावर एक निवेदन जारी केलंय. या प्रकरणातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे ही घटना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घडली. दरम्यान स्वाती मालीवाल यांनी फोनवरून त्यांना या मारहाणीची माहिती दिल्याचं लेफ्टनंट गव्हर्नर यांनी सांगितले. मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांना मारहाण झाली. या घटनेने आपण दु: खी असल्याचं गव्हर्नर म्हणालेत.

काल फोनवरून स्वाती मालीवाल यांनी मला त्यांचा वेदनादायक अनुभव सांगितला. त्यांच्या सहकाऱ्यांकडून मिळालेल्या धमक्यांबद्दल त्यांनी सांगितले. पुरावे आणि धमक्यांच्या कथित छेडछाडीबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली, असल्याचं उपराज्यपाल म्हणालेत. स्वाती मालीवाल यांनी अनेकवेळा विविध मुद्द्यांवरून माझ्यावर टीका केलीय, परंतु त्यांच्यावर झालेली मारहाण हे अस्वीकार्य आहे. सर्वात त्रासदायक बाब म्हणजे कथित गुन्ह्याचे दृश्य मुख्यमंत्र्यांच्या ड्रॉईंग रूममध्ये होते.

मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाने एकट्या महिलेला पाहून हे कृत्य केलं. दरम्यान मालीवाल यांचे राज्यसभेतील सहकारी सदस्यानी प्रसारमाध्यमांना या घटनेची पुष्टी केलीय. मुख्यमंत्री दोषींवर कारवाई करतील असे आश्वासन दिल्याचं उपराज्यपाल सक्सेना म्हणालेत. मुख्यमंत्र्यांच्या मौनावर नायब राज्यपालांनी प्रश्न उपस्थित केलेत. प्रथम त्यांच्या सहकारी राज्यसभा सदस्याने मीडियासमोर घटनेची पुष्टी केली आणि नंतर कारवाईची मागणी केल्यानंतर यू-टर्न घेतला." या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे मौन महिला सुरक्षेबाबतच्या त्यांच्या भूमिकेबद्दल बरेच काही सांगून जाते. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मी खात्री देतो की हे प्रकरण निकालात काढले जाईल, असंही नायब राज्यपाल म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT