ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP चे मुंबईसह देशभर आंदोलन
मुंबईतील शिवाजी पार्क आणि दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली
दिल्ली मेट्रोच्या ११ स्थानकांवर प्रवेश बंद
देशभरात आज CJP च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले आहे. मुंबईपासून दिल्लीपर्यंत हे आंदोलन पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर CJP च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. तसेच दिल्लीतील जंतर मंतर परिसरात देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ११ मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले आहे, आणि अनेक ठिकाणी जामर लावून नेटवर्कसेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
इंडियन एक्स्प्रेसने एक अहवाल समोर आणला यानंतर निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या अहवालानुसार, निवडणूक आयुक्त विवेक जोशी आणि सुखबीर सिंह संधू यांनी गेल्या १० महिन्यांमध्ये SIR प्रक्रियेबाबत किमान १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचं समोर आलं. त्यानंतर विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, त्यांच्या राजीनाम्याची आणि कारवाईची मागणी केली जात आहे.
ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज CJP मुंबईतील शिवाजी पार्क, दिल्लीतील जंतर मंतरसह अनेक ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. शिवाजी पार्कवर अभिजित दीपकेंना आंदोलनाची परवानगी नाकारलेली असताना देखील कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे जंतर मंतर परिसरात देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोच्या ११ महत्त्वाची स्थानके बंद करण्यात आली असून आंदोलनस्थळी जामर बसवण्यात आले आहेत.
जनपथ, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट, राजीव चौक, सेवा तीर्थ, मंडी हाऊस, लोक कल्याण मार्ग, INA, चावडी बाजार, रामकृष्ण आश्रम मार्ग ही स्थानके बंद राहणार आहेत. मात्र राजीव चौक, मंडी हाऊस, नवी दिल्ली आणि सेंट्रल सेक्रेटरिएट या स्थानकांवर इंटरचेंजची सुविधा सुरू राहणार आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरील प्रस्तावित आंदोलनाला परवानगी दिलेली नसल्याचे सांगितले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतरसह मध्य दिल्लीतील महत्त्वाच्या भागांमध्ये अतिरिक्त पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. तसेच काही भागांमध्ये वाहतूक निर्बंध आणि मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्ली मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आज प्रवासाचे नियोजन करताना या निर्बंधांची नोंद घ्यावी आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.