Two Siblings Gunned Down in Jaffrabad Saam
देश विदेश

मध्यरात्री रक्तरंजित थरार! २ सख्ख्या भावांवर अंदाधुंद गोळीबार, जागीच सोडले प्राण

Two Siblings Gunned Down in Jaffrabad: जाफराबाद परिसरात दोन भावांवर गोळीबार करून हत्येची घटना उघड. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू.

Bhagyashree Kamble

दोन भावांच्या हत्येनंतर दिल्लीत खळबळ उडाली आहे. ईशान्य दिल्लीतील जाफराबादमध्ये दोन भावांवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी पहाटे १:४० वाजता गोळीबार झाल्याची माहिती दिली. या गोळीबारात दोन्ही भावांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सध्या या हत्येमागील कारण वैयक्तिक वैमनस्य असल्याची माहिती आहे. मृताच्या मोठ्या भावाचा आरोप आहे की, त्याच्या आत्याच्या मुलांनी दोन्ही भावांची हत्या केली. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू आहे.

फजील (वय वर्ष ३१) आणि नदीम (वय वर्ष ३३) अशी मृत भावांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री जाफराबादच्या चौहान बांगर परिसरात घडली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, दोघांवरही १०-१२ गोळ्या घालण्यात आल्या. मृताचा भाऊ वसीमचा दावा आहे की, त्यांचे आत्याच्या मुलांशी भांडण झाले होते. त्यापैकी एकाने दोघा भावांवर गोळी झाडली, असा दावा त्याने केला.

दरम्यान, आरोपींना अटक केल्यानंतर सत्य उघड होईल. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन घटनेची चौकशी केली. एकाचा जागीच तर, दुसऱ्याचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे. आरोपींना अटक करण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Death: भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सामन्यादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका

Maharashtra Live News Update: पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार!

Mumbai Local: पश्चिम रेल्वेवरील लोकल वेळेत धावणार, नवीन मार्गिकेचं काम पूर्ण; कधीपासून होणार सुरु?

Bollywood Breakup: तारा आणि वीरनंतर बी-टाऊनच्या आणखी एका कपलचं ब्रेकअप; दोन वर्षाचं रिलेशन तुटलं...

Baba Vanga: बाबा वेंगांनी सांगितली 2026 मधली तिसऱ्या महायुद्धापासून एलियन्सपर्यंतची भाकीतं

SCROLL FOR NEXT