Crime samm tv
देश विदेश

Crime News: गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये गेला, शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या; ९ तास दार बंदच, शेवटी हॉटेल कर्मचाऱ्यांनी..

Mysterious Death: एका हॉटेलमध्ये शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

अति प्रमाणात शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीतील नबी करीम येथील आरक्षा रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली आहे.

तो व्यक्ती आपल्या २६ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये गेला. यावेळी त्यांनी शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या. या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सागर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती रोशनरा रोड, सब्जी मंडी परिसरात कुटुंबासोबत राहत होता आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय होता. बुधवारी दुपारी १२:१५ वाजता तो गर्लफ्रेंडसोबत नबी करीम येथील हॉटेलमध्ये गेला. नंतर त्याने रात्री ९ वाजेपर्यंत रूम बुक केली होती.

सायंकाळी ५ च्या दरम्यान त्याची मैत्रीण हॉटेलमधून बाहेर गेली आणि कर्मचाऱ्यांना "काही वस्तू आणायला जात आहे" असे सांगून निघाली. मात्र ती परतलीच नाही. रात्री ९.३० वाजता हॉटेल कर्मचारी खोलीत गेले. तेव्हा त्यांना सचिन बेडवर ब्लँकेटने झाकलेला मृतावस्थेत आढळला. कर्मचाऱ्यांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापक मुंतजार आलम यांना माहिती दिली, आणि त्यांनी पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत औषधांचे काही पुरावे जप्त केले आहेत. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.सध्या पोलिसांकडून सचिनसोबत असणाऱ्या महिलेचा शोध सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नबी करीम परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला? यामागचं कारण शक्तीवर्धक गोळ्या की आणखी काही? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sameer Wankhede VS Aryan Khan: समीर वानखेडेंना दिल्ली हाय कोर्टचा दणका, शाहरुखचा मुलगा आर्यनला दिलासा, काय घडलं?

हिवाळ्यात गरम पाण्यात आंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?

Ajit Pawar Plane Crash: ....तर असं काही घडलंच नसतं; अजित पवारांचे ड्रायव्हर श्यामराम मनवे असे का म्हणाले?

Nashik : मुंबईच्या दिशेने घोंघावत आलेलं 'लाल वादळ' वेशीवरच थांबलं!

Nails Cutting Tips: नखे कापण्याची योग्य पद्धत कोणती?

SCROLL FOR NEXT