दिल्ली: वैवाहिक बलात्काराला गुन्ह्याच्या कक्षेत आणण्याबाबत दिल्ली (Delhi) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एकमत नाहीत. न्यायमूर्ती राजीव शकधर आणि न्यायमूर्ती हरिशंकर यांचे मत वेगळे आहे. दिल्ली (Delhi) उच्च न्यायालयाने (court) याचिकाकर्त्यांना सांगितले की ते सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतात. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजीव शकधर यांनी वैवाहिक बलात्काराबाबत हा निकाल दिला आहे. न्यायमूर्ती राजीव शकधर यांनी IPC ३७५ चा अपवाद असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. ज्या अंतर्गत विवाहित नातेसंबंधातील बलात्कार हा गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही आणि पतीवर बलात्काराचा खटला चालवला जात नाही. (Delhi High Court)
हे देखील पाहा-
त्याचवेळी अन्य न्यायाधीश न्यायमूर्ती हरिशंकर त्यांच्या मताशी सहमत नाहीत. न्यायमूर्ती हरिशंकर म्हणाले की, राजीव शकधर यांच्या मताशी आपण सहमत नाही. हा अपवाद असंवैधानिक आहे, असे ते मानत नाहीत. न्यायमूर्ती राजीव शकधर आणि न्यायमूर्ती हरिशंकर यांचे मत वेगळे असल्याने ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात, असे याचिकाकर्त्यांना सांगण्यात आले आहे.
न्यायमूर्ती राजीव शकधर आणि न्यायमूर्ती हरिशंकर यांच्या खंडपीठाने भारतातील बलात्कार कायद्यांतर्गत पतींना दिलेली सूट रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सविस्तर सुनावणी केल्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी निर्णय राखून ठेवला होता. याचिकाकर्त्यांनी कलम ३७५ आयपीसी अंतर्गत वैवाहिक बलात्कार अपवादाच्या घटनात्मकतेला आव्हान दिले होते, कारण ते त्यांच्या पतीकडून लैंगिक छळ करणाऱ्या विवाहित महिलांशी भेदभाव करते.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.