विशाखापट्टणम: आसनी चक्रीवादळामुळे (hurricane) आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीकाकुलम येथील सुन्नापल्ली सी हार्बर येथे सुवर्ण रथ वाहून गेला आहे, असे सांगितले जात आहे. मंगळवारी संध्याकाळी सोन्याने मढवलेला सुंदर रथ वाहत येथे आला. हा रथ म्यानमार, मलेशिया (Malaysia) किंवा थायलंडमधून (Thailand) येथे वाहत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, संताबोमाली तहसीलदार जे चलमैय्या यांनी सांगितले आहे की, ते इतर कोणत्याही देशातून आलेले नसावे. ते म्हणाले की, रथाचा वापर भारतीय (Indian) किनारपट्टीवर कुठेतरी चित्रपट चित्रित करण्यासाठी केला गेला असावा. पण असनी चक्रीवादळामुळे (hurricane) सुवर्ण रथ श्रीकाकुलम किनाऱ्यावर आले आहे.
पाहा व्हिडिओ-
यावेळी, नौपाड्याच्या एसआयने सांगितले आहे की, ते दुसऱ्या देशातून आले असावे. आम्ही गुप्तचर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवले आहे. असनी चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असताना श्रीकाकुलम येथील सुन्नापल्ली सी हार्बर येथे एक रहस्यमय सोनेरी रंगाचा रथ किनाऱ्यावर आला आहे. "तो कदाचित दुसर्या देशातून आला असावा. आम्ही इंटेलिजन्स आणि उच्च अधिकार्यांना कळवले आहे. समुद्रात वाहणारा रथ पाहून स्थानिक ग्रामस्थांनी दोरीने बांधून त्या रथाला किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. रथाचा आकार आग्नेय आशियाई (Asian) देशांतील मठांसारखा आहे.
हे देखील पाहा-
आसनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भटकंती करून रथ येथे पोहोचेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. कमी दाबाचे क्षेत्र प्रथम दक्षिण अंदमान समुद्रावर तयार झाल्यामुळे, हा रथ म्यानमार, थायलंड, मलेशिया किंवा इंडोनेशियासारख्या अंदमान समुद्राच्या जवळच्या देशाचा असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. आसनी चक्रीवादळाचा धोका सध्यातरी टळला आहे. सध्या त्याची दिशा आंध्र प्रदेशकडे आहे. १२ मे पर्यंत वादळ पूर्णपणे कमकुवत होण्याची शक्यता आहे.
मात्र, त्याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशसह बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्ये ११ ते १३ मे दरम्यान पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशात १०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. प्रदीप कुमार जेना, भुवनेश्वर, ओडिशाचे विशेष मदत आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे पोहोचल्यानंतर हे वादळ विशाखापट्टणमला पोहोचल्यानंतर पुन्हा समुद्रात सामील होणार आहे. या दरम्यान ते कमकुवत होईल. १२ मे रोजी सकाळी चक्रीवादळ पूर्णपणे कमकुवत होईल.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.