Satyendar Jain arrested by ED  Saam TV
देश विदेश

Satyendra Jain: मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या आरोग्यमंत्र्याना ED कडून अटक

मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ED ने अटक केली आहे. या अटकेमुळे दिल्ली सरकारला मोठा धक्का बसला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Health Minister Satyendra Jain) यांना ईडीने अटक केली आहे. या अटकेमुळे दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारला मोठा धक्का बसला आहे. सत्येंद्र जैन यांनी कोलकाता येथील एका कंपनीशी संबंधित हवाला व्यवहार प्रकरणी अटक केली आहे.

जैन यांनी हवालामार्फत पैसा मागवला होता, त्या पैशांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला असून याच प्रकरणात त्यांना ईडीने अटक केली आहे. जैन हे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. दरम्यान, याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंजाबच्या निवडणूकां आधीच ED सत्येंद्र जैन यांना अटक करू शकते, असं म्हटलं होतं.

शिवाय एप्रिलमध्ये, ईडीने मनी लाँड्रिंग (Money laundering) चौकशीच्या संदर्भात जैन यांच्या कुटुंबाची आणि कंपन्यांची ४.८१ कोटी किमतीची मालमत्ता जप्त केली होती. शिवाय ईडीने यापूर्वी जैन यांना मालमत्ता जप्त करण्यासाठी पीएमएलए (PMLA) अंतर्गत तात्पुरता आदेश दिला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT