लाडकी बहीण योजना बंद, दिल्ली सरकारने थेट जाहिरातच काढली 
देश विदेश

Delhi Government : लाडकी बहीण योजना बंद, दिल्ली सरकारने थेट जाहिरातच काढली

Delhi Mahila Samman Yojana : अरविंद केजरीवाल यांनी महिला सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिना २१०० रूपये देण्याचं जाहीर केल्याच्या बातम्या आल्या होत्या.

Namdeo Kumbhar

Delhi Government Scheme News: महाराष्ट्रानंतर दिल्लीमध्येही लाडकी बहीण योजना सुरू होणार असल्याच्या बातम्या गेल्या आठवड्यात झळकल्या होत्या. नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी महिला सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिना २१०० रूपये देण्याचं जाहीर केल्याच्या बातम्या आल्या होत्या. या योजनेबाबत दिल्ली सरकारची एक जाहिरात पुढे आलेय. दिल्ली सरकारने वर्तमानपत्रात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात अशा पद्धतीची कोणताही योजना नसल्याचे म्हटलेय.

महिला सन्मान योजनेबाबत दिल्ली सरकारची एक जाहिरात समोर आली आहे. दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागानं आपल्या जाहिरातीत म्हटलंय की, मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावरील पोस्ट्समधून कळलं की एका राजकीय पक्षानं दिल्लीतील महिलांना मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत दर महिन्याला २१०० रुपये देण्याचा दावा केलाय. पण दिल्ली सरकारकडून अशा कोणत्याही योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागानं आज अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देत स्पष्टीकरण दिलेय. जर कधी अशी कोणतीही योजना दिल्ली सरकार आणणार असेल, तर त अधिसूचित केली जाईल. महिला आणि बालविकास विभाग, दिल्ली सरकार त्यासाठी एक डिजिटल पोर्टल लॉन्च करेल. पात्रतेनुसार सर्वांना त्यात अर्ज भरता येतील. पात्रतेच्या अटी आणि प्रक्रियेबद्दल विभाग वेळोवेळी स्पष्ट सूचना देईल. विभागाच्या सर्व योजनांची माहिती फक्त विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

महिला सन्मान योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे या नसलेल्या योजनेअंतर्गत नोंदणीसाठी फॉर्म/अर्ज स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. कोणताही खासगी व्यक्ती किंवा राजकीय पक्ष जो या योजनेच्या नावाखाली फॉर्म/अर्ज गोळा करत आहे. अथवा अर्जदारांची माहिती घेत आहे, तो फसवणूक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archery World Championships: सुवर्ण कामगिरी; भारताच्या तिरंदाजांनी इतिहास रचला

Nagpur: दारूबंदी असतानाही विक्री; एकाला अवैध दारूसाठ्यासह अटक

दहिसरमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, पाहा व्हिडिओ

Instant Face Pack: अर्ध्या तासात येईल चेहऱ्यावर ग्लो, वापरा हा घरात तयार केलेला फेसपॅक

SBI Clerk 2025 : SBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! क्लर्क पदासाठी मोठी भरती, ६५८९ रिक्त जागा

SCROLL FOR NEXT