Delhi Crime News
Delhi Crime News  saam tv
देश विदेश

Crime News: कसला हा निर्दयीपणा! मावशीचे क्रूर कृत्य, भाचीला ५५ हजाराला विकले; जबरस्तीने करवून घेतला वेश्या व्यवसाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Crime News: पैशासाठी मावशीनेच भाचीला ५५ हजार रुपयांमध्ये विकल्याची धक्कादायक घटना दिल्लीमधील गोविंदपुरीमध्ये (Govindpuri) घडली आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पीडित तरुणीने कशीबशी त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटली आणि एका एनजीओच्या (NGO) मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचली. दिल्ली पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. (Latest Marathi News Update)

याबाबत गोविंंदपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या आई वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यामुळे ती ती आपल्या मावशीसोबत राहत होती. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिच्या मावशीने आरोपी नंदूला 55 हजार रुपयांना विकले होते. नंदूही गोविंदपुरीत राहतो. तसे ते मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, नंदूने तिला विकत घेतले आणि आपल्या घरी नेले आणि नंतर तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.

तसेच अनेकांनी तिच्यावर अत्याचार केल्याचेही तिने सांगितले आहे. मंगळवारी संध्याकाळी एक व्यक्ती तिचा विनयभंग करण्यासाठी आला होता. मात्र, तिने चकमा देत तेथून पळ काढला. यावेळी तिला एका एनजीओचा पत्ता मिळाला आणि त्यांच्याकडे मदत मागितली. एनजीओशी संबंधित लोकांनी तिला पोलिसांकडे नेले. सध्या पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या पथकाने पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्याआधारे आरोपीविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी नंदू याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. पोलीस आरोपी महिलेचे मोबाईल लोकेशन ट्रेस करत आहेत. (Delhi Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Guar: अनेकांना नापसंत असणारी गवार आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Ratnagiri Sindhudurg : विनायक राऊतांनी नारायण राणेंचा भूतकाळ काढला; अनेक गोष्टी सांगून टाकल्या!

Pimpri Chinchwad News Today: पिंपरी-चिंचवडमध्ये मर्सिडीजमध्ये चक्क 29 लाखांची रोकड आढळून आल्यानं आश्चर्य!

Today's Marathi News Live : आजारपणात नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंना फोन करून विचारपूस करायचे; देवेंद्र फडणवीस

Food for Thyroid: आहारात 'या' पोषक घटकांचा समावेश केल्यास थायरॉईडची समस्या होईल दूर

SCROLL FOR NEXT