Delhi Flood News Highlights Saam TV
देश विदेश

Delhi Flood News Highlights: दिल्लीवर अस्मानी संकट! पूरसदृश्य परिस्थिती कायम; १५ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी

Delhi Flood News: दिल्लीत शुक्रवारी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Ruchika Jadhav

Delhi News: राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. तसेच यमुना नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दिल्लीसह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये पुराचा विळखा बसण्यास सुरूवात झाल्याचं दिसत आहे. दिल्लीत शुक्रवारी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच १५ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. (Latest Delhi Flood News Highlights)

गुरुवारी दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस झाला. लजपत नगर, साकेत, मालवीय नगर, हौज खास आणि जंगपुरा या भागांसह मध्य आणि दक्षिण दिल्लीच्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या होत्या.

२६.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

दिल्लीत २६.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हंगामाच्या सरासरीपेक्षा हे तापमान एका अंशाने कमी आहे. तर कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. सामान्य तापमानापेक्षा आजचे तापमान एक अंशाने घसरले आहे.

दिल्लीत यमुना नदीची पाणी पातळी स्थिर

हवामान विभागाने (Weather Department) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून दिल्लीतील यमुना नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. अशात गुरुवारी दिल्लीतील यमुना नदीची पाणी पातळी स्थिर झाली आहे, केंद्रीय जल आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तसेच ही पाणी पातळी आज रात्रीपासून कमी होण्यास सुरुवात होणार आहे.

रविवारपर्यंत सरकारी कार्यलये आणि शाळांना सुट्टी

हरियाणातील (Haryana) हथनी कुंडातून पाणी सोडल्याने यमुना नदीची पाणी पातळी वाढली आहे. याचा फटका आसपासच्या गावांना बसलाय. पाणी सोडल्यानंतर अल्लीपूर येथील गावांवरील यमुना नदीचा बांध तुटून संपूर्ण गावात पूर आला. यमुना नदीची पाणी पातळी वाढल्याने दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) गुरुवारी दिल्लीतील अत्यावश्यक सेवा पुरवणारी सरकारी कार्यालये यासह शाळा आणि महाविद्यालये रविवारपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT