E-rickshaw fire saam tv
देश विदेश

E-rickshaw fire: पहाटे साखर झोपेत असताना घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू

Delhi fire accident: दिल्लीतील शाहदरा परिसरातील विश्वास नगरमध्ये घराला भीषण आग लागून चार जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. घराच्या तळमजल्यावरील ई-रिक्षा पार्किंगमध्ये आग लागल्याचा संशय आहे. चार्जिंग पॉइंटमुळे आग लागली का, याचा तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दिल्लीतील शाहदरा परिसरात आगीची भीषण घटना घडलीये. विश्वास नगरमधील एका घराला रविवारी पहाटे आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. घरातील ई-रिक्षा पार्किंगमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. आगीच्या धुरामुळे पहिल्या मजल्यावर झोपलेले लोक अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. पण त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दिल्ली अग्निशमन विभागाचे राजेंद्र अटवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 4 वाजून 13 मिनिटांनी विश्वास नगरमधील युनिटी मॉलजवळील गल्ली क्रमांक 11 मधील एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाची एक वॉटर टेंडर, एक वॉटर बाउजर आणि क्विक रिस्पॉन्स वाहन घटनास्थळी पाठवण्यात आलं.

आग लागलेलं घर सुमारे 60 चौरस यार्डांचं असल्याची माहिती आहे. घराच्या तळमजल्यावर ई-रिक्षा पार्किंगची व्यवस्था होती. याशिवाय घरात मेजेनाइन फ्लोअर आणि आणखी तीन मजले होते. आग लागल्यानंतर मेजेनाइन फ्लोअरवर सहा जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढलं. त्यानंतर एम्ब्युलन्स आणि पोलिसांच्या मदतीने सर्वांना हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास रुग्णालयातील डॉक्टरांनी चार जणांना मृत घोषित केलं. तर दोघे जण सुमारे 10 टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

2 जणांवर रूग्णालयात उपचार सुरु

शाहदरा डीसीपी राजेंद्र प्रसाद मीणा यांनीही या घटनेची माहिती दिलीये. पोलिसांना आग लागल्याची माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितलंय.

प्राथमिक तपासात ई-रिक्षाच्या चार्जिंग पॉइंटवरून आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. पहिल्या मजल्यावर झोपलेले लोक आगीच्या आणि धुराच्या विळख्यात सापडले. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील औषध भांडाराची मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

थंडीत वजन कमी करायचे असेल तर पालकचा ज्यूस प्या, कधी आणि कसा बनवायचा? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना २१०० रुपये हप्ता मिळणार? शिंदेंच्या मंत्र्याने दिली महत्वाची अपडेट

Famous Actor Death : हरहुन्नरी कलाकार गमावला! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Earthquake today: भूकंपाच्या जोरदार धक्क्याने शहर हादरलं, विमानतळावर छतही कोसळलं, अवघ्या 45 मिनिटांत चार वेळा बसले धक्के

SCROLL FOR NEXT