Farmers Protest Update Yandex
देश विदेश

Farmers Protest: शेतकरी संतप्त, आज अनिश्चित काळासाठी शंभू बॉर्डरजवळ रेल्वे मार्ग रोखणार

Farmers Will Block Railway Track Shambhu Border: शेतकरी संतप्त झाले आहे. त्यांनी आता शंभू सीमेजवळ रेल्वे मार्ग अनिश्चित काळासाठी रोखणार असल्याची घोषणा केली आहे.

Rohini Gudaghe

Delhi Farmers Protest News Update

गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकरी आपल्याला विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. नेत्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी इशारा देत (Farmers Protest News) शंभू बॉर्डरजवळ रेल्वे मार्ग अनिश्चित काळासाठी रोखण्याची घोषणा केली आहे. एमएसपीसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी अनेक दिवसांपासून शंभू सीमेवर ठाण मांडून आहेत. सरकारसोबतच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. (Latest Weather Update)

रविवारी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान-मजूर मोर्चाने हरियाणा आणि पंजाबसह देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचं दहन केलं होतं. याशिवाय शेतकऱ्यांनी आज शंभू बॉर्डरजवळ रेल्वे ट्रॅक (Block Railway Track) अनिश्चित काळासाठी रोखण्याची घोषणा केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वास्तविक नवदीप जलवेदा आणि अन्य शेतकरी नेत्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्याची तात्काळ सुटका करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध करत पंतप्रधानांच्या पुतळ्याचं दहन केलं (Delhi Farmers Protest News) होतं. आपल्या नेत्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी इशारा देत शंभू सीमेजवळ रेल्वे मार्ग अनिश्चित काळासाठी रोखण्याची घोषणा केली आहे.

शंभू सीमेवर (Shambhu Border) शेतकरी त्यांच्या एमएसपीसह अनेक मागण्यांसाठी दीर्घकाळापासून आंदोलन करत आहेत. कारण सरकारसोबतच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. आता देशात लोकसभा निवडणुकीचा टप्पा सुरू झाला आहे. अशा स्थितीत शेतकरी शांततेत आंदोलन करत आहे. चर्चेदरम्यान सरकारने अनेक मागण्यांवर सहमती दर्शवली होती, परंतु शेतकरी सर्व मागण्या मान्य करण्यावर ठाम होते.

भारतीय किसान मजदूर युनियनचे जिल्हा प्रमुख बुटा सिंह खराजपूर (Delhi News) म्हणाले की, केंद्र सरकारच्या आदेशानुसार हरियाणासह अनेक राज्यांच्या सरकारांनी आमच्या शेतकरी नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकले आहे. जोपर्यंत शेतकरी नेत्यांची तुरुंगातून सुटका होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आंदोलक शेतकऱ्यांवर इतके अत्याचार आणि मनमानी होऊनही केंद्र सरकार थांबत नसल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT