Arvind Kejriwal ANI
देश विदेश

Arvind Kejriwal: पुजाऱ्यांना दरमहा मिळणार ₹ 18000 ; केजरीवालांची घोषणा, नेमकी काय आहे योजना?

Arvind Kejriwal News: आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पुजारी ग्रंथी योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पुजाऱ्यांना दरमहा १८ हजार रूपये मिळणार आहेत.

Bhagyashree Kamble

दिल्लीत २०१३ सालापासून सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीसाठी विधानसभा निवडणुका अनेक अर्थानं खास आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकांना काही दिवस शिल्लक आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. अशातच गेल्या काही दिवसात आम आदमी पार्टीनं अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांसाठी २१०० रूपये, संजीवनी योजनेंतर्गत ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी मोफत उपचार, वयोवृद्धांसाठी पेन्शन योजना आणि पुजाऱ्यांना दरमहा वेतन यांचा समावेश आहे.

आज ३० डिसेंबरला आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुजारी ग्रंथी योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत मंदिरांच्या पुजाऱ्यांना दरमहा १८ हजार रूपये देणार असल्याची माहिती दिली.

या योजनेसाठी उद्यापासून नोंदणी सुरू होणार असून, पुजारी ग्रंथी योजना मंगळवारी ३१ डिसेंबरला कॅनॉट प्लेस येथून सुरू होणार आहे. या योजनेची सुरूवात कॅनॉट प्लेस येथील प्राचीन हनुमान मंदिरापासून नोंदणी सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, 'पुजारी समाजाची सेवा करतात. परंतु त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. पुजारी ग्रंथी योजना अशा प्रकारची योजना पहिल्यांदाच देशात कुणीतरी सुरू करणार आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार आल्यास सर्व पुजाऱ्यांना दरमहा १८ हजार रूपये मानधन दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

मी स्वत: पुजाऱ्यांची नोंदणी करेन

केजरीवाल पुढे म्हणाले, उद्या मी स्वत: कॅनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरातील पुजाऱ्यांची नोंदणी करणार आहे. मी भाजपला विनंती करतो की त्यांनी या योजनेत अडथळे आणू नयेत. ही नोंदणी थांबण्याचा प्रयत्न करू नये. जर त्यांनी असं केलं तर त्यांना पाप लागेल, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांनी अनेक योजनांची घोषणा केली आहे. नुकतंच भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले, दिल्लीच्या जनतेला 'आप' या पक्षानं दिलेल्या आश्वासनांपेक्षा ५ पट अधिक लाभ देण्यास आम्ही तयार आहोत, असं खासदार तिवारी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shocking : वंशाला दिवाच हवा म्हणून गर्भपात केला, पण महिलेचा जीव गेला, सोलापूरमधील धक्कादायक घटना

Gold Price Today : आजपण सोनं महागलं, ख्रिसमसला प्रति तोळा इतका दर वाढला, पाहा ताजे रेट्स

BOI Recruitment: खुशखबर! फ्रेशर्ससाठी बँकेत नोकरी; ४०० पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

Baba Vanga: पुढचं वर्ष बदलणार आर्थिक गणितं? बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार ४ राशी ठरणार श्रीमंत

SCROLL FOR NEXT