Manish Sisodia News/file saam tv
देश विदेश

Manish Sisodia: मोठी बातमी! मनिष सिसोदियांना धक्का! न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळ्याप्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात आली होती..

Gangappa Pujari

Delhi News: दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्यात आरोपी असलेल्या दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज राउज एवेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने आज त्यांना २० मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनिष सिसोदिया यांच्यसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे... (Latest Marathi News Update)

याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना मद्य घोटाळ्याप्रकरणात २६ फेब्रूवारीला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सीबीआयने ८ तासांच्या चौकशीनंतर सिसोदियांना ताब्यात घेतले होते.

27 फेब्रुवारी रोजी राऊस अव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत पाठवले होते, जेणेकरुन त्यांची सविस्तर चौकशी करता येईल. सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयातही जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

समोर आलेल्या माहितीनुसार, आप नेते सिसोदिया यांनी न्यायालयीन कोठडीत औषधे, डायरी, पेन आणि भगवद्गीता तुरुंगात ठेवण्याची परवानगी मागितली आहे. सिसोदिया यांना मेडिटेशन सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

तत्पुर्वी मनिष सिसोदियांवरील कारवाई निंदाजनक असल्याचे सांगत अनेक राजकीय नेत्यांनी मनीष सिसोदिया यांना पाठिंबा दर्शवला होता. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नऊ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. देशात तपास यंत्रणाच्या माध्यमातून विरोधाकांवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी पत्रातून केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Kartiki Ekadashi : एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रखुमाईची महापूजा संपन्न, नांदेडच्या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

SCROLL FOR NEXT