Youth Died After Beaten By Dhaba Owner Saam tv
देश विदेश

Delhi Crime: ढाब्यावर जेवायला गेला, परत घरी आलाच नाही; तरूणासोबत नेमकं काय घडलं?

Youth Died After Beaten By Dhaba Owner: राजौरी गार्डन परिसरात असलेल्या काफिला ढाब्यामध्ये ही घटना घडली. याप्रकरणी ढाब्याच्या दोन्ही मालकांना अटक करण्यात आली आहे.

Priya More

दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरामध्ये तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जेवण आणायला उशिरा का केला? असा जाब विचारल्यामुळे संतप्त झालेल्या ढाब्याच्या मालकांनी २९ वर्षांच्या तरुणाची बेदम मारहाण करत हत्या केली. राजौरी गार्डन परिसरात असलेल्या काफिला ढाब्यामध्ये ही घटना घडली. याप्रकरणी ढाब्याच्या दोन्ही मालकांना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण आणण्यावरून हा वाद झाला होता. ढाब्यामध्ये ऑर्डर केलेले जेवण आणायला उशिर झाल्यामुळे हा वाद ऐवढा वाढला की तरुणाची हत्या करण्यात आली. तरुणाने ढाबा मालकाला जेवण आणायला ऐवढा उशिरा का केला असा प्रश्न विचारला. त्यामुळे हॉटेलचा मालक केतन नरूला आणि अजय नरूला संतप्त झाले. त्यांनी २९ वर्षीय हरनीत सिंह सचदेवा या तरूणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या हरनीतला त्याच्या मित्रांनी तात्काळ रुग्णालायत नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याला मृत घोषीत केले.

पोलिसांना हॉस्पिटलमधून हत्या झालेल्या तरुणाबद्दल माहिती मिळाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून हरनीत आपल्या मित्रांसोबत काफिला नावाच्या एका ढाब्यावर जेवणासाठी गेला होता. त्याने जेवण ऑर्डर केले पण जेवण यायला उशिर झाला. त्याने ढाब्याच्या स्फाटला विचारणा केली तर त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर ढाब्याच्या स्टाफने मालकाला ही माहिती दिली. तेव्हा ढाबा मालक केतन नरूला आणि अजय नरूला इतर मित्रांना घेऊन तिथे आले. त्यावेळी तरुण आणि ढाबा मालकांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

मृत तरुणाच्या आईने सांगितले की, 'हरनीत संध्याकाळी ७ वाजता घरातून बाहेर पडला होता आणि पहाटे ३.३० वाजता त्याने आपल्या पत्नीला व्हिडीओ कॉल करत जोरदार पाऊस पडत आहे आणि लवकर घरी येईल असे सांगितले. त्यानंर ४.२३ वाजता त्याच्या मित्राचा फोन आला आणि हरनीत हाणामारीत जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. आम्ही पोहचेपर्यंत तिचा मृत्यू झाला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

Chanakya Niti: हुशार लोक या 6 ठिकाणी धाडस दाखवत नाहीत; खड्ड्यात पडण्यापासून व्हा सावध, वाचा चाणक्यांचा सल्ला

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

SCROLL FOR NEXT