Delhi Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : बॉयफ्रेंडच्या मित्रांनी केली शरीर सुखाची मागणी, नकार देताच महिलेसोबत भयंकर घडलं

Delhi Crime News : दिल्लीतील मंगोलपुरी परिसरात एका महिलेची प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • दिल्लीतील मंगोलपुरीत महिलेची हत्या

  • प्रियकर आणि त्याच्या मित्रांचा सहभाग

  • मृतदेह पलंगाखाली लपवला

  • पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास सुरू

दिल्लीतील मंगोलपुरी परिसरात एका ३५ वर्षीय महिलेच्या निर्घृण हत्या करण्यात आली. बॉयफ्रेंडच्या मित्रांनी शरीर सुखाची मागणी करताच महिलेने नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने प्रेयसीची पीजी रूमवर हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतदेह पलंगाखाली लपवून पळ काढला. पोलिसांनी बॉयफ्रेंड आणि त्याच्या २ मित्रांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना मंगळवारी दुपारी मंगोलपुरी येथील पत्थर मार्केटमधील एका पेइंग गेस्टमध्ये घडली. मृत महिला आणि दीपक यांची गेल्या ८ ते ९ वर्षांपासून ओळख होती. दोघेही विवाहित होते, पण अनेकदा लपूनछपून भेटत असत. मंगळवारी संध्याकाळी दीपक त्या महिलेला एका पीजी रूममध्ये घेऊन गेला, जिथे त्याचे मित्र सुरेंद्र आणि जोगिंदर हे देखील आले होते.

दीपकने गर्लफ्रेंडला त्याच्या दोन मित्रांसोबतही लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. तिने विरोध केल्यावर त्यांच्यातील वाद वाढला. त्या तिघांनी मिळून तिचा गळा दाबून हत्या केली. महिलेचा मृत्यू झाल्याचे पाहून तिघेही घाबरले. पुरावा नष्ट करण्यासाठी, त्यांनी मृतदेह एका पेटीत लपवून पेटी पलंगाखाली टाकून पसार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी पत्थर मार्केटमधील एका पीजी रूममध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली होती. पीजी ऑपरेटर अमरजीतने सांगितले की, त्याचा ओळखीचा दीपक एका मैत्रिणीसोबत आला होता, पण थोड्या वेळाने एकटाच निघून गेला. संशय आल्याने खोलीची झडती घेतली असता, पलंगाखाली त्या महिलेचा मृतदेह आढळून आला. पीजी मालकाच्या जबाबावरून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेत त्यांना काही तासांमध्ये बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT