Delhi Crime News Saam TV
देश विदेश

Delhi Crime News : दारू पिऊन भांडण केल्याने पत्नीने थेट पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला; दिल्लीमधील भयंकर घटना

Woman Attacks Husband Private Part : पत्नीने रागाच्या भरात आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. यामध्ये पती गंभीर जखमी आहे.

Ruchika Jadhav

उत्तर दिल्लीमधील रुपनगर परिसरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पत्नीने रागाच्याभरात आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. यामध्ये पती गंभीर जखमी असून सफदरजंग रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पत्नी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेबाबत फोन आला होता. महिलेने केलेला प्रताप ऐकून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पीडित पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या घटनेबाबत महिलेविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे. तसेच फरार पत्नीचा शोध सुरू आहे.

पतीने आपल्या तक्रारी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय पीडित पती 38 वर्षीय पत्नीसह गेल्या तीन-चार महिन्यांपासून राहत होता. या दोघांचा हा तिसरा विवाह होता. पीडित पती शक्तीनगर येथील एका पीजीमध्ये हेल्पर म्हणून काम करतो. तो मूळचा बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील रहिवासी आहे.

नेमकं काय घडलं?

31 ऑक्टोबर रोजी पती दारू पिऊन घरी आला. त्यानंतर पत्नी बरोबर एका गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला. पती-पत्नी मधील वाद जास्त विकोपाला गेला. त्यानंतर रागावलेल्या पत्नीने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ती घरातून बाहेर निघाली. त्यानंतर काही वेळाने पती झोपून गेला. पती झोपलेला असताना पत्नी पुन्हा एकदा घरी आली. तसेच रात्री तिने पतीच्या गुप्तांगावर हल्ला केला. यामध्ये तो प्रचंड जखमी झाला.

पीडित पतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच फरार पत्नीचा शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT