Delhi Crime News  Saam Tv
देश विदेश

Shocking : २० रुपये देण्यास नकार दिला, रागात नवऱ्याने बायकोची गळा दाबून केली हत्या, नंतर स्वत: धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

Delhi Crime News : दिल्लीत 20 रुपयांच्या शुल्लक वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली आणि नंतर रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

प्रत्येकाच्या घरी छोट्या मोठ्या कारणावरून भांड्याला भांडं हे लागतचं. हि भांडण समजूतदारपणाने सोडवली तर कुटुंब देखील एकोप्याने राहतं. मात्र पोटात सतत खदखदत राहणाऱ्या या रागाने जर टोक गाठलं तर अनर्थ होऊ शकतो. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. नवरा बायकोच्या शुल्लक भांडणातून नवऱ्याने बायकोची हत्या केली आणि नंतर स्वतः देखील ट्रेनसमोर जाऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीतील शाहदरा शहरात कुलवंत सिंग त्याची पत्नी महिंदर कौर आणि त्यांचं कुटुंब राहतं. कुलवंत आणि महिंदरमध्ये नेहमीच छोटी मोठी भांडण व्हायची. बुधवारी सकाळी कुलवंत आणि महिंदर यांच्यात वाद झाला. कुलवंतने त्याच्या पत्नीकडून २० रुपये मागितले, पण तिने नकार दिला. यामुळे कुलवंत संतप्त झाला. त्याने घराच्या छतावर महिंदरचा गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह घराच्या आतमध्ये नेला.

बुधवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास महिलेच्या दिराने पोलिसांना फोन करून सांगितले की, त्यांना शेजाऱ्याचा फोन आला आहे. शेजाऱ्याने सांगितले की, महिंदर घरातील खोलीत मृतावस्थेत पडली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार, पोलिस तिथे पोहोचले तेव्हा महिंदर शालमध्ये गुंडाळलेल्या अवस्थतेत पडली होती. महिंदरच्या मुलाने पोलिसांना सांगितले की त्याच्या आईने आत्महत्या केली आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नव्हते. पोलिसांना मृत महिलेच्या गळ्यावर गळा दाबल्याचे वळ दिसले. तिथेच पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी तातडीने तपास सुरु केला. शिवाय याच वेळेस महिंदरचा नवरा देखील घरात नसल्याने पोलिसांनी त्याची शोधाशोध केली.

महिंदरच्या शवविच्छेदनातही गळा दाबून हत्या केल्याचा उल्लेख असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कुलवंतचा शोध सुरू केला. जेव्हा त्यांना तो सापडला, तेव्हा तो रेल्वे रुळांवर बसलेला होता. पोलिसांना पाहून तो रुळांवर पळू लागला. अटकेच्या भीतीने त्याने चालत्या ट्रेनसमोर उडी मारली. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.  या घटनेनेनंतर कुलवंत आणि महिंदरच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT