Delhi Crime News Saamtv
देश विदेश

Delhi Crime News: सुखी संसाराचा भयंकर शेवट! आधी पत्नीची निर्घृण हत्या; नंतर स्वतःही संपवले आयुष्य, कारण...

Couple Found Dead Inside House: पती-पत्नीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भांडण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

Delhi Crime News: गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारी घटना घडताना दिसत आहेत. पुण्यातील दर्शना पवार (Darshna Pawar Death Case) हत्याकांड ताजे असतानाच राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये पतीने आधी पत्नीची हत्या करुन स्वतःही आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. (Crime News In Marathi)

अधिक माहिती अशी की, दिल्लीतील (Delhi) नरेला पोलीस स्टेशन हद्दीतील स्वतंत्र नगरमध्ये एका जोडप्याचा घरात मृतदेह आढळून आला. याप्रकरणात पोलिसांनी बुधवारी माहिती दिली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ज्यानंतर या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भांडण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. याच रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी सापडलेले पुरावे पोलिसांच्या पथकाने सोबत घेतले आहेत. तसेच दोघांच्याही कुटुंबीयांकडून माहिती गोळा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. (Crime News)

दरम्यान, पतीचे वय 40 वर्षे आहे. तर पत्नीचे वय 37 वर्षे आहे. दोघांचे लग्न होऊन बरीच वर्षे झाली होती. त्यांना एक 15 वर्षांचा मुलगाही असल्याचे सांगण्यात येत आहे. आधी पत्नीची हत्या करुन पतीने गळफास घेतला असावा असाही अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायतीचे पोटनिवडणूक जाहीर; मतदान आणि निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

2029 साली वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांचं मोठं विधान

सुवेंदू अधिकारींच्या पीएची गोळ्या झाडून हत्या, निकालानंतरही बंगलामध्ये हत्येचं सत्र सुरूच

Pune Crime: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अपरहण करून केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT