Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : भर रस्त्यात त्याने स्वत:च्या गळ्यावर फिरवला चाकू, नंतर झाडली गोळी; VIDEO

त्या व्यक्तीला जखमा झाल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Delhi Police : दिल्लीमधून एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने स्वत: आपल्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यानंतर तो रस्त्यावर हातात बंदूक घेऊन फिरत होता. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. तसेच त्या व्यक्तीला जखम झाल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Delhi News)

स्वत:वर वार करत झाडली गोळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान एमएस पार्क पोलिसठाण्यात एक फोन आला होता. नाथू कॉलनी या परिसरात कृष्ण शेरवाल या व्यक्तीने स्वत:च्या गळ्यावर चाकून वार केला आहे, असं फोनवर पोलिसांना सांगण्यात आलं. त्या कृष्णच्या हातात एक बंदूक असून त्याने एक गोळी देखील हवेत झाडली आहे असं, पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएस पार्क पोलिस स्टेशनमध्ये कलम ३०७, २९४, ३९७ आणि १८६ या कलमांतर्गत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाचे पत्नीसोबत वाद झाले होते. त्यामुळे तो नैराश्यात होता, अशी माहिती समोर आली आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये रस्त्यावर सायंकाळच्या वेळी बाजार परिसर असल्याने गर्दी दिसत आहे. भर गर्दीत तरुणाने स्वत:वर वार केल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ पसरली. त्याने असं कृत्य केल्यावर तेथे पोलिस देखील त्याला पकडताना दिसत आहेत. सध्या या कृष्ण शेरवालवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसला हत्तींच्या कळपाची धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Mumbai Crime: मुंबई हादरली! कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अल्पवयीन मुलींवर बलात्कार; अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

Kitchen Hacks : सोफा कुशनवर डाग लागल्यास काय करावे? जाणून घ्या योग्य टिप्स

Kolhapur Tourism : पश्चिम घाटातील निसर्गरम्य ऐतिहासिक ठिकाण, हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट

Bollywood Actress : साऊथ चित्रपटात काम करणे कठीण; लोकांनी केल्या शरीरावर कमेंट्स, अभिनेत्री गेली होती ट्रॉमामध्ये

SCROLL FOR NEXT