Crime News  Saam Tv
देश विदेश

Delhi Crime News: ३५ वर्षीय महिलेचं ७१ वर्षीय वृद्धाशी लग्न; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह, त्या रात्री काय घडलं?

Husband Killed His Wife In Delhi : फ्लॅटच्या आतमध्ये पोलिसांना ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला आहे.

Ruchika Jadhav

Crime News:

Delhi News: दिल्लीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे ३५ वर्षांच्या एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. फ्लॅटच्या आतमध्ये पोलिसांना ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिल्लीच्या पॉश रजौरी परिसरात ही घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव पूजा असे आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेने ७१ वर्षीय एसके गुप्ता यांच्याशी विवाह केला. गुप्ता यांना ४५ वर्षांचा एक दिव्यांग मुलगा देखील आहे. त्याच्या देखभालीसाठी गुप्ता यांना कोणत्यातरी व्यक्तीची गरज होती त्यामुळे त्यांनी या पूजाशी लग्न केलं.

सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यावर गुप्ता आणि पूजा या दोघांमध्ये वाद होऊ लागले. हे वाद विकोपाला गेले. त्यामुळे त्यांनी या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. महिलेने त्यांना घटस्फोटाची नोटीस पाठवली. तसेच पोडगीमध्ये १ कोटी रुपयांची मागणी केली. गुप्ता हे एक चार्डट अकाऊंटंट आहेत. त्यामुळे महिलेने इतक्या पैशांची मागणी केली. मात्र गुप्ता यांनी एवढी मोठी रक्कम देण्यास नकार दिला.

या सर्व प्रकरणामुळे ते फार चिंतेत होते. अशात त्यांच्या दिव्यांग मुलाच्या देखभालीसाठी असलेल्या व्यक्तीला त्यांनी ही माहिती दिली. त्यावर त्या व्यक्तीने गुप्ता यांच्याकडे १० लाखांची मागणी करत महिलेला कायमचं संपवण्याचं अश्वासन दिलं. ठरल्याप्रमाणे त्या व्यक्तीने पूजाच्या अंगावर चाकूने वार करत तिची हत्या केली. तसेच ही हत्या चोरीच्या दृष्टीने केली असावी असा बनाव करण्यासाठी त्यांनी घरातील काही सामानाची तोडफोडही केली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेचे शव ताब्यात घेतले. यावेळी गुप्ता यांनी सुरुवातीला पोलिसांना फसवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या घटनेमागच्या खऱ्या कहानीचा छडा लावलाच. सध्या गुप्ता आणि मारेकरी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : नवरात्रीत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा |VIDEO

NPS, UPS आणि अटल पेन्शन योजनेच्या नियमांत मोठा बदल, १ ऑक्टोबरपासून लागू होणार

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये डेंग्यू रुग्णसंख्या 400 पार

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Jolly LLB 3 BO Collection: अक्षय कुमारचा चित्रपट ब्लॉकबस्टर ओपनिंगसाठी सज्ज; 'जॉली एलएलबी 3' करणार का रेकॉर्ड ब्रेक कमाई?

SCROLL FOR NEXT