Delhi Crime News Saam Tv
देश विदेश

Delhi Crime News: दिल्ली पुन्हा हादरली! मित्रासोबत पार्कमध्ये फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Delhi Girl Physically Assaulted: याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Priya More

Delhi News: दिल्लीमध्ये (Delhi) अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार (Physically Assaulted) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात (Shahbad Dairy Area) ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास शाहबाद डेअरी पोलिसांकडून (Shahbad Dairy Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसारत 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. ही घटना 27 जून रोजी घडली होती. पीडित मुलगी आपल्या मित्रासोबत पार्कमध्ये फिरायला गेली होती. फिरुन झाल्यानंतर ती आपल्या मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी पार्कमध्ये आलेल्या तीन तरुणांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीसोबत असलेल्या तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. तर या तरुणांनी त्याला मारहाण करत पळवून लावले.

त्यानंतर या तरुणांनी पीडित मुलीला जबरदस्ती पार्कमधील झाडाझुडपात ओढत नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तरुणांनी घटनास्थळावरुन पळ काढला. तरुणांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडित मुलगी धावत धावत घरी गेली आणि तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. तर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

पीडित मुलीने कुटुंबीयांसोबत शाहबाद डेअर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. या घटनेमुळे दिल्लीमध्ये पुन्हा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिल्लीमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.अशामध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीवर शासन दरबारी सकारात्मक विचार सुरू

Infertility Issue: जास्त तणावामुळे वंध्यत्वाची समस्या होते का?

Bhadgaon News : भडगाव शहर स्फोटाने हादरले; हॉटेलमधील भीषण स्फोटात १० जण जखमी

Viral News : देने वाला जब भी देता...! तासभर पडला पैशांचा पाऊस, लोकांची उडाली झुंबड; अनेकांनी नोटा टाकल्या खिशात

Nana Patekar : माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे... Ind Vs Pak सामन्याला नाना पाटेकरांचा तीव्र विरोध, VIDEO

SCROLL FOR NEXT