Delhi Latest News Saamtv
देश विदेश

Delhi Crime: मित्राच्या मृत्यूनंतर मुलीवर अत्याचार... सरकारी अधिकाऱ्याचे विकृत कृत्य; मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ निलंबन

Delhi Latest News: घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी...

Delhi Crime News: देशाची राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली सरकारमधील महिला व बालकल्याण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्याने मित्राच्या १४ वर्षीय मुलीवर अनेक महिने अत्याचार केला. घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांचे ट्विट करत त्या अधिकाऱ्याला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मित्राच्या मृत्यूनंतर त्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दिल्ली (Delhi) सरकारमधील महिला व बालकल्याण विभागातील बड्या सरकारी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून आरोपीने २०२० ते २०२१ या कालावधीत अनेकदा बलात्कार केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने आपल्या पत्नीच्या मदतीने तिचा गर्भपात केला. या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्याला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

२०२० मध्ये या मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर आधार देण्याच्या बहाण्याने संबंधित अधिकाऱ्याने तिच्याशी जवळीक साधत के कृत्य केले. दरम्यान, या घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच, या प्रकरणी मुख्य सचिवांकडून सायंकाळी 5 वाजेपर्यंत रिपोर्ट मागवला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT