delhi crime news Saam Tv
देश विदेश

Shocking: धक्कादायक! मित्रच बनला वैरी; २५ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या, नेमकं घडलं काय?

Delhi Crime News: रविवारी रात्री दिल्लीतील एका धक्कादायक प्रकरणात २५ वर्षीय युवकाची तीन जणांनी दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन आरोपींना पकडले असून तिसरा आरोपी फरार आहे.

Dhanshri Shintre

दिल्लीत रात्रीच्या सुमारास एक भयंकर घटना घडली. समयपूर बादली परिसरात रविवारी रात्री एका २५ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. मात्र एक आरोपी अजूनही फरार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृताचे नाव मनीष कुमार असून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मनीष उर्फ बाबू आणि सुमित अशी आहेत. हे दोघे २२ आणि २३ वर्षांचे आहेत.

रविवारी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास मनीष कुमार आणि त्याचा मित्र संतोष कुमार श्रीवास्तव समयपूर बादली परिसरात बाबूला भेटायला गेले होते. काही दिवसांपूर्वी बाबूने मनीषला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सबवेजवळ झालेल्या एका भेटीत दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. बाबूसोबत त्याचा साथीदार सुमित आणि आणखी एक मित्रही सामील झाला.

या तिघांनी दगड घेऊन मनीष व संतोषवर हल्ला केला. मनीषच्या डोक्याला खूप दुखापती झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध पडला. संतोषने शुद्धीवर आल्यानंतर पाहिले की मनीष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. त्याने ताबडतोब मदतीसाठी पोलिसांना माहिती दिली. मनीषला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. ज्यात तीन हल्लेखोर दिसून आले. अटक करण्यात आलेल्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक स्कूटर, एक बाईकचा आणि हत्येत वापरलेले दगड जप्त केले आहेत.

तपासादरम्यान बाबू हा पूर्वी एका खून प्रकरणात सहभागी असल्याचे उघड झाले. त्याच्यावर इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. बाबू आणि मनीष यांच्यातील वादाचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. संतोष कुमार श्रीवास्तव याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून अटक केलेल्या दोघांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर तिसरा आरोपी फरार आहे आणि त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजीत दीपकेने दिली महत्वाची अपडेट, सरकारला दिला थेट इशारा

Pune IT Job Scam: पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा घोटाळा; ३०० हून अधिक तरुणांची फसवणूक, कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट

झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार , अल्पवयीन मुलीची प्रसूतीनंतर बाळ विकलं; दोन नामांकीत डॉक्टरांसह ११ जणांना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT