Viral Video Saamtv
देश विदेश

Police Man Viral Video: वर्दीतला अवलिया! पोलिसाने गायले अरिजित सिंगचे गाणे; जादूई आवाजावर नेटकरी फिदा; VIDEO तुफान VIRAL

Police Man Sing Aabad Barbaad Song: व्हिडिओमघील तरुणाच्या जादूई आवाजाने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे, अनेकांनी त्याला वर्दीतला अर्जित सिंग असे म्हणले आहे.

Gangappa Pujari

Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला रोज नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला आश्चर्य चकित करतात, तर कधी सुखद धक्का देतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो पाहू तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडिओ दिल्लीतील एका पोलिसाचा आहे ज्याने अरिजित सिंगचे आबाद बरबाद गाणे गायले आहे. व्हिडिओमधील त्या पोलिसाच्या आवाजाने सर्वांनाच थक्क केले आहे. (Viral Video)

पोलिस म्हणलं की धीरगंभीर, शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व अशीच ओळख आपल्याला माहित असते. मात्र पोलिसाच्या वर्दीतही अनेक कलाकार दडलेले असतात, ज्याची प्रचिती क्वचितचं पाहायला मिळते. सध्या एका वर्दीतल्या अवलियाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्याच्या जादूई आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. व्हिडिओमधील पोलिसाच्या आवाजाचे नेटकऱ्यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे.

या व्हायरल व्हिडिओतील पोलिसाचे नाव रजत राठोर असे असून त्याने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, रजत त्याचे गिटार वाजवताना आबाद बरबाद हे गाणे गाताना दिसत आहे. हे गाणे 2020 मध्ये आलेल्या ल्युडो चित्रपटातील आहे आणि ते अरिजित सिंगने (Arijit Singh) गायले आहे. प्रीतमने हे गाणे संगीतबद्ध केले होते, तर संदीप श्रीवास्तव यांनी त्याचे बोल लिहिले होते.

आपल्या गाडीमध्ये बसून हातात गिटार पकडून या तरुणाने हे गाणे गायले आहे. या गाण्याचा व्हिडिओ  18 मार्च रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून तो 62,400 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या आहेत.

नेटकऱ्यांनी पाडला प्रतिक्रियांचा पाऊस...

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी या पोलिसाला वर्दीतला अर्जित सिंग असे म्हणले आहे, तर काही जणांनी हा आवाज ऐकून मन प्रसन्न झाले, असे म्हणत व्हिडिओचे कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT