दिल्लीत आज इंडिया आघाडीच्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे जवळपास 100 मोठे नेते दिल्लीत दाखल झालेय. यामध्ये हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेशये. ज्ञानेश कुमारांविरोधात काढण्यात येणाऱ्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते मोठ्या संख्येने दिल्ली दाखल झालेय..
दिल्लीतील सुप्रीम कोर्टाकडे निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशनच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर निर्बंध.
आज, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सहा मेट्रो स्टेशनचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद.
बंद असलेली मेट्रो स्टेशन : १. पटेल चौक
२. जनपथ
३. राजीव चौक
४. मंडी हाऊस
५. सेंट्रल सेक्रेटरिएट
६. बाराखंबा रोड
या सहाही स्टेशनवर मेट्रो बदलण्याची सुविधा सुरू राहणार.
काँग्रेससह विरोधी पक्षांचा सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा काढण्याचा कार्यक्रम.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार यादीतील अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला जाणार.
सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो प्रशासनाचा निर्णय; परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सूचना दिल्या जाणार.
दिल्लीतील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि मार्गबदल होण्याची शक्यता.
'इंडिया' आघाडीच्या सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंडी हाऊसजवळ असलेल्या बाराखंबा रोडवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिसांसोबतच आरएएफ आणि सीआरपीएफच्या (CRPF) तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या (DSGMC) तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि इतर आमदार व नेत्यांव्यतिरिक्त इतरांवर एफआयआर (FIR) दाखल केली आहे.
या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, गुरुद्वारा बंगला साहिबच्या परिसरात गोंधळ घालण्यात आला आणि त्यानंतर सोशल मीडियावर दिशाभूल करणारे व्हिडिओ व पोस्ट पसरवण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीसोबत सादर केलेल्या व्हिडिओ फुटेजची तपासणी केली जात असून त्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
देशभरातील काँग्रेसचे आजी-माजी आमदार दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. माजी आमदार दिप्ती चौधरी दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झाला पाहिजे यासाठी आम्ही राहुलजींचा आवाज बनत आहोत. यापेक्षाही मोठं आंदोलन देशभरात उभं राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
जननेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. देशात मतचोरी झाल्याचे गंभीर आरोप आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न यावर आमची मागणी स्पष्ट आहे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि लोकशाहीचे रक्षण सुनिश्चित करावे.अतुल लोंढे
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर वाढत्या विरोधामधून आता केरळमधून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन सोमवारी विधानसभेत मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी करणारा एक विशेष प्रस्ताव मांडणार आहेत.
दरम्यान इंडिया आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील 6 मेट्रो स्टेश बंद करण्यात येणारये. सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित स्थानकांवर इंटरचेंज सुविधा मात्र सुरळीत सुरू राहणारये. सुरक्षा यंत्रणांकडून दुपारी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून, त्यानंतर पुढील निर्णय जाहीर केला जाणारये...दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुया कोणती मेट्रो स्टेशन बंद आहे...
काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीच्या सर्वोच्च न्यायालयावर निघणाऱ्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्लीत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पाहता मध्य दिल्लीतील प्रमुख ६ मेट्रो स्थानकांची प्रवेश आणि बाहेर पडण्याची (Entry-Exit) दारे दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, आंदोलनामुळे अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आल्याने दिल्ली वाहतूक पोलिसांकडून ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. या अचानक लादलेल्या निर्बंधांमुळे नागरिक आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
इंडिया आघाडी आज दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात मोठं आंदोलन करणारये. इंडिय़ा आघाडी सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढला जाणार असून यासाठी काँग्रेसच्या सर्व आमदार खासदारांना एकत्र जमण्याचे आदेश देण्यात आलेय... मतचोरी थांबवावी, SIRवर बंदी घालावी अशा मागण्याचं निवेदन काँग्रेस सरन्यायाधीशांना देणार आहे...
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाला सरन्यायाधीश यांनी भेटीची परवानगी नाकारली
तुमच्या विषया च्या अनुशंगाने याचिका दाखल केल्यास त्यावरून सुनावणी घेऊ
सरन्यायाधीश यांनी केल स्पष्ट
मतदारयाद्यांमधील कथित अनियमितता, 'व्होट चोरी'चे आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशाची राजधानी दिल्ली ढवळून निघाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात 'इंडिया' आघाडीचा (INDIA Alliance) महामोर्चा काढला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.