Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, उद्या तिहार तुरुंगात जावंच लागणार

Delhi News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाची मुद्दत आज संपत असून उद्या त्यांना पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार आहे.

Satish Kengar

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर न्यायालयाने आज निर्णय दिलेला नाही. यामुले आता केजरीवाल यांना उद्या 2 जून रोजी तिहार तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण करावे लागणार आहे. न्यायालयाने निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांची 10 मे रोजी 21 दिवसांच्या अंतरिम जामिनावर सुटका केली होती. त्याच्या जामिनाची मुदत 2 जून रोजी संपत असून रविवारी त्याला शरण जावे लागणार आहे.

याआधी केजरीवाल यांनी आपल्या प्रकृती आणि वैद्यकीय चाचणीचे कारण देत अंतरिम जामीन आणखी 7 दिवस वाढवण्याची विनंती केली होती. या याचिकेवर शनिवारी न्यायालयात सुनावणी झाली. केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीला ईडीने विरोध केला. केजरीवाल यांच्या बाजूने एन हरिहरन कोर्टात हजर झाले आणि एएसजी एसव्ही राजू हे तपास यंत्रणा ईडीतर्फे हजर झाले.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हेही ऑनलाइन सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांनी असा युक्तिवाद केला की, शुक्रवारी केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत 2 जून रोजी आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले नाही. अशी विधाने करून ते न्यायालयाची दिशाभूल करत आहेत.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर राऊस एव्हेन्यूच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सुनावणी पूर्ण झाल्याचे सांगितले. आता अंतरिम जामिनावर न्यायालय 5 जून रोजी निर्णय देण्यात येणार आहे.

यावेळी एन हरिहरन यांनी अरविंदची बाजू मांडताना सांगितले की, ईडी असे सुचवण्याचा प्रयत्न करत आहे की, जो आजारी आहे किंवा त्याची वैद्यकीय स्थिती वाईट आहे, त्याला उपचार मिळणार नाहीत? कलम 21 नुसार हा माझा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला जामीन अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली होती. त्याच आधारावर आम्ही नियमित आणि अंतरिम जामीन मागितला आहे. हरिहरन यांनी न्यायालयाला सांगितले की, केजरीवाल सध्या त्यांच्या प्रकृतीच्या स्थितीमुळे नियमित जामीन नसून अंतरिम जामीन मागत आहेत. 1994 पासून ते मधुमेहाने त्रस्त आहेत. ते दररोज इन्सुलिनचा डोस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

Udid Dal Vada : उडदाच्या डाळीचे कुरकुरीत वडे कसे बनवायचे? जाणून घ्या रेसिपी

‘Bigg Boss 19’च्या घरातून २ सदस्यांचा पत्ता कट, नाव वाचून बसेल धक्का

रूग्णाला ऑपरेशन बेडवर सोडलं, दुसऱ्या रूममध्ये नर्ससोबत शारीरिक संबंध ठेवलं; डॉक्टरचा प्रताप

Maharashtra Live News Update: मिनी मंत्रालयावर चौथ्यांदा येणार महिलाराज,गट आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींला आला वेग

SCROLL FOR NEXT